भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहर महानगर पालिकेच्या माध्यमिक शाळा (इयत्ता 9 वी व 10 वी) च्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्यावतीने शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
शहरातील गैबीनगर येथील माध्यमिक शाळा सभागृहात झालेल्या कार्यक्रमास महापौर
नारायण चौधरी,उपमहापौर तारीक अब्दुलबारी मोमीन,आयुक्त अनमोल सागर,अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके,उपायुक्त बाळकृष्ण क्षिरसागर,
सहायक आयुक्त
नितीन पाटील,प्रशासन अधिकारी सौदागर शिखरे यांच्या हस्ते शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

महानपालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये चर्चेनुसार विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया अधिक भक्कम करणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम या योजनेंतर्गत शालेय बाबींकरिता निधीची तरतूद केली होती.त्यानुसार महापालिकेच्या माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण आणि विद्यार्थीहिताचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे त्याची अंमलबजावणी महापौर चौधरी यांच्या आदेशा नुसार करण्यात आली.
महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता नववी व दहावीच्या सुमारे दोन हजार 815 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. विद्यार्थी हे शहराचे व देशाचे भविष्य असून त्यांच्या शैक्षणीक कार्यामध्ये महापालिके कडून पुर्णत: सहकार्य केले जाईल.त्यांना शैक्षणिक कामात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही असे मत महापौर नारायण चौधरी यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आपले भविष्य उज्वल करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.शाळेच्या कोणत्याही समस्या असल्यास थेट मनपा प्रशासनाशी संपर्क साधावा. त्यांच्या मागण्या न्याय व रास्त असल्यास त्यांची तातडीने पुर्तता करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांना शिकविणारे शिक्षक देखील प्रगत असावे याकरिता शिक्षकांना देखील प्रशिक्षण दिले जाईल.पालिका प्रशासन हे विद्यार्थी,शिक्षक यांचे पाठीशी सदैव उभे असेल, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे शिक्षण द्यावे आणि विद्यार्थ्यांनी देखील चांगले गुण मिळवून याचे सार्थक करावे असे मत आयुक्त सागर यांनी व्यक्त केले.या वेळी विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

