भिवंडी ( प्रतिनिधी ) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा बंडखोर खासदारां विरोधात संपूर्ण
महाराष्ट्रातील शिवसैनिकां मध्ये प्रचंड आक्रोश व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे त्यांच्या विरोधात ” तुडवा निषेध “आंदोलन सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून भिवंडीत रविवारी शिवसेना (उबाठा) पक्षाचेवतीने बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या फोटो प्रतिमेला शिवसैनिकांनी जोडे मारून आपला संताप व्यक्त करीत आक्रोश व्यक्त केला आणि निषेधाच्या घोषणा दिल्या,
भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील
रस्त्यावर झालेल्या निषेध आंदोलनात सेनेचे उपनेते विश्वास थळे,ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख कुंदन पाटील,जिल्हा सहसंपर्क प्रमुख मनोज गगे,मोहन बल्लाळ,गणेश मोरे,शहर प्रमुख प्रदिप बोडके,अरुण पाटील,महेंद्र कुंभारे,जय भगत,महिला उपजिल्हा संघटक कविता भगत,वैशाली मेस्त्री,संगिता जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी सहभागी झाले होते.


