भिवंडीत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही..मात्र दोन्ही मतदारसंघातून 64 इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र नेली..

भिवंडी



भिवंडी ( प्रतिनिधी )  भिवंडी पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप व उदय किसवे यांच्या उपस्थितीत सुरू झाली आहे निवडणूक कार्यालयांमध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र मंगळवार (दि.22 आँक्टोबर )कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून देण्यात आली मात्र भिवंडी पूर्व विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून आज दुपारी  विविध पक्ष व अपक्ष असे 29 जणांनी 
नामनिर्देशन पत्र घेऊन गेले असल्याची माहिती पुर्व विधानसभा  निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप यांनी दिली.तर भिवंडी पश्चिम विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांच्या उपस्थितीत भाजप व इतर पक्ष आणि अपक्ष अशा ऐकुण 35 इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. असे एकुण दोन्ही मतदारसंघातून 64 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज नेले आहेत.
विशेष म्हणजे भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचेवतीने महेश चौगुले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.मात्र भिवंडी पुर्व आणि भिवंडी पश्चिम या दोन्ही मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) काँग्रेस, एमआयएम पक्षाचेवतीने अद्याप कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र तरीही इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज नेले आहेत.त्यामुळे मतदार व विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मध्ये औत्सुक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. 

चौकट
उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आज पासून (दि 22 आँक्टोबर) सुरू झाली आहे.त्यामुळे 137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या 9 पक्षीय व 20 अपक्ष अशी एकूण 29 नामनिर्देशन पत्र घेऊन गेले असल्याची माहिती भिवंडी पुर्व विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. मात्र आज मंगळवार रोजी  एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नसल्याचे सांगण्यात आले.

चौकट
शिवसेना (उबाठा) – 01
भारतीय काँग्रेस पक्ष – 02
एमआयएम – 02
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 02
चेंज मेकर पक्ष – 02
अपक्ष 20 अशी नामनिर्देशन पत्र अशी एकुण 29 इच्छुक नामनिर्देशन पत्र घेऊन गेले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप यांनी दिली…

चौकट
मंगळवार पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असुन 136 भिवंडी पश्चिम विधानसभा निवडणूक कार्यालयातून 16 उमेदवारांनी एकूण 35 नामनिर्देशन पत्र घेऊन गेले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली आहे.त्यात भाजप पक्षाचेवतीने 6 अर्ज नेण्यात आले आहेत.
मात्र आजच्या दिवसात  एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही. 

चौकट
भारतीय काँग्रेस पक्ष -05
भारतीय जनता पार्टी- 06
ए आय एम आय एम -04
जनता कांग्रेस पार्टी- 01
चेंज मेकर पक्ष – 01
अपक्ष – 18
अशी 35 नामनिर्देशन पत्र घेऊन गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *