ठाणे जिल्हाधिकाऱ्यासह पोलिस आयुक्तांनी भिवंडतील दोन्ही विधानसभा मतदारसंघांचा कामकाजाचा घेतला आढावा..

भिवंडी



EVM मशिन ठेवणेचे स्ट्रॉग रूम केली पाहणी

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून 137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी  अमित सानप व 136 भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांनी आपापल्या कार्यालयामध्ये पदभार स्वीकारून कामकाज सुरू केले आहे.राजकीय पक्षांचे पदाधिकारी व निवडणूक कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत, त्यामुळे या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी अचानकपणे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी आपल्या विशेष पथकासह भेट देऊन मध्यवर्ती मुख्य निवडणूक कार्यालय व  EVM मशिन ठेवणेचे स्ट्रॉग रूम ची पाहणी करून संबंधीत निवडणूक निर्णय  अधिकाऱ्यांशी चर्चा केली.


 भिवंडी पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.उद्या पासुन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.त्यामुळे निवडणूक यंत्रणा सुद्धा सतर्क झाली असून निवडणूक कार्यालयामध्ये कामकाज सुरू झाले आहे.मतदान प्रक्रिया व  निवडणूक कामकाज सुरळीत सुरू राहणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सोमवार सकाळी 11 : 35 वा.


ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी 137 भिवंडी पूर्व निवडणूक कार्यालय व 136 भिवंडी पश्चिम निवडणूक कार्यालयास भेट दिली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप व निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी  अभिजीत खोले,सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाळाराम जाधव, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी सुदाम इंगळे यांच्यासह काही प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी निवडणूक कामकाज संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणूक कामाचा आढावा घेतला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांना नामनिर्देशन भरण्याकरता सविस्तर मार्गदर्शन करा, नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल याबाबत सतर्क रहावे तसेच विनाकारण उमेदवारांना ताटकळत ठेवू नका,अशा  महत्त्वपुर्ण  सुचना त्यांनी यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या,मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्र (EVM) मशिन ठेवण्यात येणारे स्ट्रॉग रूम
ची सुध्दा पाहणी सुध्दा केली. निवडणूक अधिकारी व कर्मचारीऱ्यांना मतदान केंद्रावर पाठवणे व मतदानानंतर साहित्य स्विकारणेचे ठिकाण सुरक्षितता बाबतीत चर्चा करून मतमोजणी ठिकाणाची पाहणी करीत मौलिक सुचना त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी पोलीस अधिकारी व महापालिका कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *