पाच वर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात चीनच्या हद्दीत पोहचला ठाणे जिल्ह्यातील डी वाय फाउंडेशनच्या महिलाचा पहिला गट..

भिवंडी


भिवंडी (प्रतिनिधी ) : पाच वर्षांपासून बंद असलेल्या पवित्र कैलास मानसरोवर यात्रेला पाच वर्षानंतर १५ जुलै २०२५ पासून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी निघालेल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडीचा महिलांचा पहिला गट चीनच्या हद्दीत दाखल झाला आहे.या गटात भिवंडीतील डी.वाय.फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा प्रियांकाताई दयानंद चोरघे यांच्यासह भिवंडीतील महिलांचा समावेश आहे.महिलांच्या या धार्मिक यात्रेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
    कैलास मानसरोवर यात्रा ही अध्यात्माची उच्च अनुभूती देणारे स्थान आहे. कोरोना महामारीमुळे २०२० पासून कैलास मानसरोवर यात्रेवर लागलेली बंदी आता उठवण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना कैलास मानसरोवर यात्रा करण्याचे भाग्य लाभले आहे.या यात्रेसाठी ठाण्यातील महिलांचा पहिला गट चीनच्या हद्दीत दाखल झाला असून या गटात भिवंडीतील डी.वाय.फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा प्रियांकाताई दयानंद चोरघे यांच्यासह भिवंडीतील महिलांचा समावेश आहे. अध्यात्मिक वारसा लाभलेल्या चोरघे  कुटुंबातील धार्मिक वृत्तीच्या प्रियांकाताई या नियमित विविध तीर्थस्थळांना भेटी देत असून अशा ठिकाणी 
भगवान शिवाच्या कृपेने प्रथम यात्रेकरू होण्याचे भाग्य लाभल्याने भगवान शिवाने आपला कृपेचा हात आपल्यावर ठेवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या मानसरोवर यात्रेचे आयोजन भिवंडी तालुक्यातील कोनगांवच्या विद्यमान सरपंच रेखा सदाशिव पाटील यांनी केले आहे. कैलास मानसरोवर  पहिल्या तुकडीमध्ये डी.वाय.
फाउंडेशनच्या महिला अध्यक्ष प्रियांकाताई दयानंद चोरघे यांच्यासह कोनगांव सरपंद रेखा सदाशिव पाटील,
बेबी बाळाराम चौधरी,
वर्षा चौधरी,मोना म्हात्रे, हर्षला चौधरी, भानुमती पाटील,आरती भोईर, रचना पाटील,मोनिका भोईर, मनीषा कीणे, करुणा पाटील, गिरीजा पाटील, प्रीतीशा पाटील, चम्पा भोईर, भारती म्हात्रे, तनिष्का चौधरी, ओम चौधारी, जोत्स्ना पाटील, उज्वला विनोद ठाकरे, आर्या चौधरी, मीनाक्षी  पाटील, यांचा समावेश आहे. या सर्वांनी आज रोजी ३० जुन रोजी यमद्वार पासुन कैलास मानसरोवर यात्रा संपुर्ण परिक्रमा करण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *