ईडी, सीबीआय चा भाग दाखवून मोठ्या कंपनीकडून भाजपा पैसे उकळत आहे

भिवंडी

देशातील सर्वात मोठा स्कॅम इल्क्ट्रोल बाँड मुळे समोर आला आहे – राहुल गांधी 

भिवंडी  ( प्रतिनिधी ) देशातील मोठ्या कंपन्यांना ईडी,सीबीआय व इन्कम टॅक्स चा 
धाक दाखवून भाजपा सरकारने त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये उकळण्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही असे परखड मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
राजकीय पक्षांचे अर्थकारण साफ करण्याच्या बाता मारून देशाच्या प्रधानमंत्री मोदी यांनी आणलेली इलेक्ट्रॉल बाँड ही संकल्पना राबवली. पण या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे वसुली करून भाजपा सरकारने भ्रष्टाचार केला आहे देशातील हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचे मत ही गांधी यांनी यावेळी व्यक्त केले भिवंडी तालुक्यातील सोनाळे गांव येथील मैदानात  आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत  संतप्त 
होऊन राहुल गांधी आपले परखड मत व्यक्त करीत होते. यावेळीकाँग्रेस पक्षाचे नेते जयराम नरेश,खासदार इम्रान प्रतापगढी,आमदार विश्वजित कदम,माजी मंत्री आरिफ नसीम खान,ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे,भिवंडी शहरध्यक्ष रशिद ताहीर मोमीन,तारीक फारूकी,डॉ.नुर 
अंसारी आदीं मान्यवर उपस्थित होते.भाजप सरकार व मोदी च्या  इशाऱ्यावर ईडी,सीबीआय व इन्कम टॅक्स च्या अधिकाऱ्यांकडून मोठ्या उद्योग कंपन्या चालकांना धाक दाखवून कारवाई होते व त्यानंतर या कंपनी 
इलेक्ट्रॉल बाँड च्या माध्यमातून भाजपाला निधी देतात.हा प्रकार खंडणी उकळण्याचा प्रकार आहे असा आरोप खा.राहुल गांधी यांनी केला.अनेक वेळाईडी,सीबीआय कडून दबाव आणून कारवाई होते व त्यांना इलेक्ट्रॉल बाँड खरेदी करण्यास भाग पाडून त्यातून भाजपाने पैसे घेतले.सरकार मोठ्या उद्योजकांना कॉन्ट्रॅक्ट देतात त्यातून काही  हिस्सा अशा उद्योगां कडून
भाजपला इलेक्ट्रॉल बाँडच्या रुपात मिळाला आहेदेशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
सीबीआय,ईडी चौकशी नाही मात्र त्यांच्या धाकामुळे भाजपा पक्षाला मोठा निधी मिळत असल्याची माहिती गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.भाजपाने सर्व यंत्रणांना आपल्या काबूत करून ठेवले आहे हे राष्ट्र विघातक काम भाजपा करीत
आहे.ईडी,सीबीआय चा दबाव टाकून राजकीय पक्ष फोडले जातात. काँग्रेस पक्ष मजबूत आहे.महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी यांना भाजपाने याच भ्रष्ट मार्गाने जमवलेल्या पैशाने तोडले आहे.पण तरी  महाराष्ट्रात महाविकास आघाडी 
जिंकणार आहे असे सांगत सीबीआय,ईडी,व इन्कम टॅक्स या शासकीय संस्था भाजपाचे हत्यार आहे.भविष्यात काँग्रेस पक्षाला निधी देणाऱ्या कंपनीवर  कारवाई होऊ शकते अशी शक्यता नाकारता येणार नाही असे वक्तव्य करीत पण लक्षात ठेवावे की एक दिवस भाजपा हरेल आणि आम्ही सत्तेवर येऊ असा विश्वास शेवटी राहुल गांधी यांनी व्यक्त केला.यावेळी ठाणे सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण व ठाणे ग्रामीण अधीक्षक डॉ. स्वामी यांनी खडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *