भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना पोलीस महासंचालक पदक..

भिवंडी

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  जनार्दन सोनवणे यांनी आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात अंमली पदार्थ तस्करी,खुन, मोटरसायकल चोरी सारखे विविध गुन्ह्यांचा कौशल्यपुर्ण शिताफीने तपास करून गुन्हेगारांना गजाआड करून कायदा सुव्यस्था अबाधित ठेवली त्यांनी केलेल्या या उज्वल कामगिरीची विशेष दखल राज्य शासनाने घेत त्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर केले
असुन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते त्यांना 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून देण्यात आले, यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण,अतिरिक्त पोलीस विनायक देशमुख, आयुक्त यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते,त्यामुळे मान्यवर नागरिकांनी व पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांचे सोनवणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.


    मुंबई,नाशिक,लासलगाव,ठाणे, अंबरनाथ अशा मोठ्या शहरात  उत्कृष्ट सेवा काम करून जनार्दन सोनवणे हे सध्या भिवंडी येथे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव, ईद,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सह विविध धार्मिक सण शांततापुर्ण संपन्न होण्यासाठी त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याचे सहकार्याने समांतर तपासणी अंतर्गत विशेष मेहनत घेतली. भिवंडी शहर परिसरात घडलेले घरफोडी,चोरी,
अंमलीपदार्थ,दरोडा, खुना,मोटारसायकल चोरी सारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणून शहरातील कायदासुव्यस्था अबाधित ठेवली त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाची विशेष दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर केले होते त्यानुसार महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पदक देण्यात आले.सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस उपाआयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बगाडे यांच्या सह मान्यवर नागरिकांनी सोनवणे यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *