भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहरातील कामतघर – ताडाळी परिसरात राष्ट्रीय इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन (NIMA) व राष्ट्रीय इंटिग्रेटेड कलाकार, कार्यकर्ता मंच यांच्या सयुक्त विद्यमाने महारक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले होते या शिबीरात शेकडो महिला व नागरिकांनी सहभाग घेत रक्तदान केले तसेच विनामूल्य शारीरिक आरोग्य चिकित्सा तपासणी करून औषध घेतली.


राष्ट्रीय इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन (NIMA) चे महाराष्ट्र प्रमुख डॉ.राजेश दहापुते यांच्या पुढाकार तसेच राष्ट्रीय इंटिग्रेटेड कलाकार आणि कार्यकर्ता मंच (NIFAA) यांच्या सहकार्याने शारीरिक आरोग्य चिकित्सा तपासणी व महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी मधुमेह,सर्दी,खोकला, ताप,रक्तदाब,हाडांचे आजार, अंगदुखी अशा विविध आजाराची व रक्त तपासणी डॉ.आशुतोष
कुलकर्णी, डॉ.राजेश दहापुते,डॉ.विनायक टेंभुर्णीकर,डॉ.विष्णू बावणे,श्रीधर सिद्धुपटला,डॉ.रमेश अडेप,डॉ.दत्तू डॉ. मेघा पाटील, डॉ.अपर्णा दहापुते,डॉ.धनंजय सिंह,डॉ.सुरेश इगा यांनी करून रूग्णांना औषध देण्यात आली.तसेच यावेळी 40 हुन अधिक लोकांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले हे शिबीर यशस्वी करण्यासाठी लाइफ लाइन ब्लड बँक कल्याण, सेवा संस्था, तेलगू समाज,युवा मित्र मंडळ, सिद्धार्थ मित्र मंडळ अशा विविध समाजसेवी संस्थानी सहकार्य केले.