भिवंडी महापालिका आयुक्त प्रशासनाने वाढीव मालमत्ता कर रद्द करावी,शिवसेनेचा माजी  उपमहापौरांनी केली
मागणी.

भिवंडी


—————


भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहर महानगर पालिका आयुक्त प्रशासनाने लोकप्रतिनिधी व सर्व सामान्य नागरिकांना विश्वासात न घेता घरपट्टी व पाणीपट्टी मालमत्ता करात मनमर्जी करून मोठया प्रमाणात वाढ केली आहे त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे अर्थिक बजेट कोसळल्याने महिला व नागरिकां
मध्ये तीव्र संतापाची लाट आहे.त्यामुळे आयुक्तांनी लोकभावनेचा आदर करून  मालमत्ता कर वाढ तात्काळ कमी करावी अशी मागणी भिवंडी महापालिकेचे शिवसेनेचे माजी उपमहापौर जेष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांनी केली.


  याबाबत मनोज काटेकर यांनी आयुक्त अनमोल सागर यांना  लेखी निवेदन पत्र दिले आहे. भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रातातील रहिवासी नागरिकांना सन २०२५-२६ मध्ये
मालमत्ता कर भरण्यासाठी जी बिल देण्यात आलेली आहे त्यात जल लाभ कर व मल लाभ कर यामध्ये रहिवासी क्षेत्राला १५% टक्के वाढीव व व्यावसायिक क्षेत्राला २३ % टक्के वाढ करण्यात आलेली आहे.त्यामुळे नागरिकां मध्ये मध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे.
पालिकेकडे नियमित घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिक किंवा मुदतीत भरणाऱ्या नागरिक या प्रकारामुळे त्रस्त झाले आहे.भिवंडी शहरामध्ये अनेक लोक महापालिकेला कर (टॅक्स) भरत नाहीत.
त्यामुळे पालिकेचे मोठे नुकसान होत आहे,
त्यामुळे विकास कामांवर सुध्दा मोठा परिणाम होत असतो त्यामुळे आयुक्त प्रशासनाचेवतीने मालमत्ता थकबाकी करणाऱ्या करदात्या कडून कर वसूल करण्यासाठी दरवर्षी जानेवारी,
फेब्रुवारी व मार्चमध्ये मालमत्ता करावर व्याज माफीची सवलत देत असतो. त्यामुळे नियमित कर (टॅक्स) भरणाऱ्या लोकांवर नकळत अन्याय होत असतो,त्यामुळे महापालिकेच्या क्षेत्रातील सर्व मालमत्ताचे जी.पी.एस.सर्व्हे करुन प्रत्येक मालमत्ताचं मोजमाप करुन घेतल्यास महापालिकेला वार्षिक ७.५० ते ८ कोटीचा घरपट्टी व पाणीपट्टी उत्पन्नात वाढ होऊ शकते.
त्यामुळे अनेक इमारत, घर व इतर मालमत्तांची कर आकारणी झाली आहे का,तसेच मालमत्ता कर कमी व जास्त प्रमाणात होत असल्याचे उघड होईल व वार्षिक मालमत्ता उत्पन्नाचे स्रोत वाढ होईल असे मत उपमहापौर काटेकर यांनी व्यक्त केले आहे. व्यावसायिक क्षेत्रासाठी २३ % टक्के जल लाभ कर व मल लाभ कर लावलेला आहे त्यामुळे व्यावसायिक नाराज झाले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा सुविधा मिळत नाहीत असे असताना मालमत्ता कर वाढ करून न कळत शिक्षा देण्याचा प्रकार नकळत पालिकेकडून होत आहे सध्या विविध व्यवसाय मंदीच्या छायेत आहेत असे असताना अचानक कर वाढ झाल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत.त्यामुळे रहिवासी व व्यावसायिकावर लावण्यात आलेला कर वाढ तातडीने रद्द करावी अशी मागणी माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *