भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी तालुक्यातील नारपोली पोलीस ठाण्याचे हद्दीत असलेल्या गोदामातील सुमारे 24 लाख रुपये किमंतीचे 26 लँपटाँप चोरट्यांनी पळविले होते या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता त्यामुळे नारपोली पोलीस व भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांचे विशेष पोलीस पथक समांतर तपास करीत असताना मिळालेल्या माहिती वरून पोलीस पथकाने घरफोडी करणाऱ्या दोघा जणांना कर्नाटक राज्यातून ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून चोरी केलेला सुमारे 24 लाख 65 हजार रुपये किमतीचे 26 लॅपटॉप हस्तगत करून जप्त करण्यात आले आहेत.या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडीतील नारपोली पोलिस ठाणे हद्दीत 7 मार्च 2025 रोजी एका गोदामातील घरफोडी मध्ये 26 लॅपटॉप चोरी केल्याची घटना घडली होती.त्यामुळे परिसरातील व्यावसायिक मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता याबाबत सविस्तर तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोपणीय खबर मिळताच त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणा वरून या गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले.या आरोपींचा शोध घेतला असता सदर गुन्हयातील दोघे आरोपी हे कर्नाटक राज्यातील कन्याकोळ तांडा जिल्हा यादगिर येथे लपून बसले असल्याचे समजले.
त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस उपाआयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी सहा.पोलीस निरीक्षक धनराज
केदार,सहा.पो.उप निरी.सुधाकर
चौधरी,पोलिस कर्मचारी प्रकाश पाटील,प्रशांत राणे,सुदेश घाग,सचिन जाधव, अमोल इंगळे,भावेश घरत,विजय कुंभार यांचे विशेष तपास पोलिस पथक निर्माण करीत त्यांना कर्नाटक येथे रवाना केले पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार
तेथून दिलीप बसवराज चव्हाण (वय.20 वर्षे) अर्जुन मुन्नु राठोड (वय.23 वर्षे ) या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.त्यांच्या कडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी चोरट्यांनी गोदामातून चोरी केलेले लिनोव्हा कंपनीचे 26 नग लॅपटॉप व गुन्ह्यांत वापरलेले वाहन असा एकूण 24 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या गुन्ह्यातील अटक आरोपी दिलीप बसवराज चव्हाण,
अर्जुन मुन्नु राठोड हे सराईत गुन्हेगार असुन ते गोडाऊनची रेकी करून छिन्नी व हातोडीचे सहाय्याने भिंत फोडून घरफोडी चोरी करीत यापूर्वी सुद्धा या दोघां विरोधात भिवंडी तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

