युवकांसह महिलांनी धार्मिक,पर्यावरणाची जनजागृती
भिवंडी (भानुदास भसाळे) नववर्ष गुढीपाडव्या निमीत्ताने भिवंडी शहरातील विविध भागात सालाबाद प्रमाणे सकाळी मोठय़ा जल्लोषात शोभा दर्शक स्वागतयात्रा वाजतगाजत काढण्यात आल्या होत्या.सामाजिक संस्था,विद्यार्थी,व महिला मंडळाचेवतीने पर्यावरणाचे रक्षण करा झाडे लावा झाडे जगवा व पाण्याची बचत करा, स्वच्छता,आरोग्य संदर्भात असे विविध संदेश यावेळी फलक लाऊन देण्यात आले या स्वागत यात्रेमध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह मान्यवर नागरिक,महिला व युवकवर्ग मोठ्या उत्साहात शेकडो च्या संख्येने सहभागी झाले होते.

शहरातील ब्राम्हणआळी येथून गणपती मंदिर येथुन सकाळी यात्रेस प्रारंभ करण्यात आला.
टिळक चौक,काळभैरव मंदिर,वाणीआळी, प्रभुआळी मंडई,गणपती मंदिर,महालक्ष्मी
मंदिर,पारनाका अंबेमाता मंदिर व शनी मंदिर संत नामदेव महाराज पथ,स्व.सिंधुबाई वसंत भसाळे मार्ग,ठाणगे आळी, कासार आळी,मार्गँ ही स्वागत यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाली. शिवस्वरूप व शिवाजी नगर ढोलताशाच्या गजरात वाजतगाजत निघालेल्या स्वागत यात्रेत खासदार सुरेश (बाळा मामा) म्हात्रे, आमदार महेश चौघुले,शिवसेना शहर अध्यक्ष सुभाष माने, भाजपा अध्यक्ष हर्षल पाटील,निलेश आळशी,ठाकरे गटाचे भिवंडी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज गगे,सामाजिक कार्यकर्ते कृष्णा
गाजेंगी,प्रदिप राका,विराज पवार,जेष्ठ पत्रकार शरद भसाळे अदि मान्यवर नागरिकां सह महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज चौक व स्वागत यात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी आकर्षक गुढी उभारून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
चौकट
नववर्ष गुढीपाडवा सणा निमित्ताने भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संस्था संचालित पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,शेठ जुगीलाल पोद्दार इंग्रजी स्कूल,विद्याश्रम मराठी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या शोभायात्रेत संस्थाध्यक्ष विजय जाधव,अरुणा जाधव,आर.एन पिंजारी,
मुख्याध्यापक सुधीर घागस,पी.एन पाटील,
समाजकल्याण न्यास संस्थाध्यक्ष सोन्या पाटील,श्रीराम
भोईर,ज्ञानेश्वर गोसावी,
उपप्राचार्य देवीदास अहिरे यांच्यासह शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व शेकडो विद्यार्थी,नागरिक सहभागी झाले होते.या शोभायात्रे मध्ये विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी,ग्रंथ दिंडी,लेझिम पथक,
तारफा नृत्य,ढोल ताशा पथक,यांसह विद्यार्थी मराठी शाळांचे महत्व दर्शविणारे फलक घेऊन सहभागी झाले होते.तसेच गोपाळनगर येथे दादासाहेब दांडेकर विद्यालयाचेवतीने विद्यार्थ्यांनी देखील गोपाळनगर,अशोकनगर आदि भागातून ही स्वागत यात्रा काढण्यात आली होती.यावेळी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.