भिवंडी ( प्रतिनिधी ) बागेश्वर धाम पिठाचे प्रमुख पंडित श्री.धीरेंद्र शास्त्री महाराज यांचे श्री.भागवत कथा सप्ताह चे आयोजन भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गांव परिसरात असलेल्या बागेश्वर बालाजी धाम मठाच्या प्रांगणात दि.५ ते ११ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भागवत कथा सप्ताहाचे आयोजक रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.


यावेळी बागेश्वर बालाजी धाम प्रतिनिधी नितेंद्र चौबे,सामाजिक कार्यकर्ते राम माळी व दिलीपकुमार नवल आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीमद् भागवत सप्ताह दरम्यान कथा वाचन प्रवचन स्वतः पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज हे करणार असून या दरम्यान ८ व १३ एप्रिल रोजी कार्यक्रमस्थळी दिव्य दरबार कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले आहे.तर १२ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव या मठामध्ये साजरा केला जाणार आहे.१४ एप्रिल रोजी भारतातील दुसऱ्या व महाराष्ट्रातील पहिल्या श्री.बागेश्वर बालाजी सनातन महाराष्ट्र मठात देवीदेवतांचे मुर्ती ची प्राणप्रतिष्ठापना विविध धार्मिक कार्यक्रम मान्यवर पंडीत ब्राह्मणाचे हस्ते होणार असून मठाचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
असल्याची माहिती
कार्यक्रम आयोजक रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी दिली आहे.