भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीच्यावतीने शहरातील येथील अमजदिया उर्दू प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात “विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धन” व विज संरक्षण या विषयावर जनजागृती मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात शेकडो विद्यार्थांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन वीज पुरवठा व सुरक्षा संदर्भात माहिती अवगत करून घेतली.

टोरंट विज कंपनीच्या तज्ञांनी विज सुरक्षा संदर्भात माहिती दिली तसेच यावेळी चित्रफीत सुध्दा दाखवण्यात आली.विद्युत सुरक्षा,संरक्षण व ऊर्जा संवर्धन बाबतीत माहिती दिली.तसेच यावेळी विद्यार्थ्यांसाठी वीज सुरक्षा बाबतीत प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.यावेळी समयसूचकता माहिती उत्तरे देणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.घर व कार्यालयात वीज वापर व त्यातूनच वीज सुरक्षा आणि वीजेचे संवर्धन हा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पोहचावावा यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते अशी माहिती जनसंपर्क अधिकारी चेतन बदीयानी यांनी दिली.