उपविभागीय अधिकाऱ्यासह विविध राजकीय पक्षांचे सरपंच सदस्य उपस्थित.
भिवंडी (शरद भसाळे )
महाराष्ट्रात नगरपालिका,महानगर पालिका, जिल्हापरिषद,व ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असुन निवडणूक आयोग व राज्य शासनाच्या आदेशानुसार आरक्षण सोडतीचे कार्यक्रम महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले असुन आज भिवंडीत उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार अभिजित खोले यांच्या उपस्थितीत सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.यावेळी भाजप,शिवसेना पक्षासह अन्य पक्षाचे पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच,सदस्य व महिला कार्यकर्तेनी मोठी गर्दी केली होती. या वेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी सभागृह व बाहेरील रस्त्यावर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राज्य शासनाने यापूर्वी सरपंच पदासाठीच्या काढण्यात आलेले आरक्षण सोडत रद्द केल्याने नव्याने अध्यादेश काढीत आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिल्याने भिवंडी तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतीं पैकी अनुसूचित ( पेसा) क्षेत्रातील ४० ग्रामपंचायती वगळता उर्वरित ८१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीच्या आरक्षणाची सोडत आज मंगळवार सकाळी कामतघर येथील वऱ्हाळ माता मंगल कार्यालय या ठिकाणी उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार अभिजित खोले यांच्या उपस्थितीत पार पडली.भिवंडी तालुक्यातील ४० ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असल्याने उर्वरित ८१ ग्रामपंचायतीं पैकी ६ अनुसूचित जाती,८ अनुसूचित जमाती,२२ नागरिकांचा मागास प्रवर्ग,तर उर्वरित ४५ या सर्वसाधारण यांच्यासाठी राखीव असून यामध्ये ४० सरपंचपद ही महिलांसाठी राखीव असून अनुसूचित क्षेत्रातील ४० पैकी २० सरपंच पदे ही सुध्दा महिलांसाठी राखीव असणार आहेत. ही सरपंच आरक्षण सोडत प्रसंगी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर,अव्वल कारकून किरण केदार,शैलेश भोजने,
गणेश पाटील,निवडणूक विभागाचे आनंद पवार यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदार अभिजित खोले यांनी विविध ग्रामपंचायत नांवाचा पुकारा करून शालेय विद्यार्थी चे हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत जाहीर केली.शिवसेना,
भाजप, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे अशा विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व विविध गावातील इच्छुक उमेदवार,सरपंच,
सदस्यांनी आरक्षण पाहण्यासाठी सभागृहात गर्दी केली होती.
चौकट
भिवंडी तालुक्यातील सरपंच पद आरक्षण सोडत प्रवर्ग निहाय खालील प्रमाणे
अनुसूचित जाती महिला – वडघर वडपे,कवाड
अनुसूचित जाती सर्वसाधारण – भोकरी,पडघा,कोन,
अनुसूचित जमाती महिला – कुकसे, सावंदे, आलीमघर,कुरुंद
अनुसूचित जमाती सर्वसाधारण – लामज,किरवली तर्फे खंबाळे,नांदकर सांगे, सापे इतर मागास वर्गीय महिला – गोरसई,सरवली,
कालवार,ओवळी,भादाणे,
राहूर,कांदळी,वळ,
कारिवली,अंजूर,कशेळी
इतर मागासवर्गीय सर्वसाधारण – महापोली,लाप,
खांडपे तर्फे चिंचवली,निंबवली,
पिंपळास,काल्हेर,
खंबाळे,जूनांदुर्खी,
बापगाव,डोहाळे,
दापोडे
सर्वसाधारण महिला – शेलार,राहनाळ,
भिनार, कोशिंबे,
चावे,तलवली अर्जुनली,पुंडास,पिसे,
मोरणी,आवळे,कुसापूर,
कोपर,कासणे,खानिवली,
दिवे केवणी,आमणे,
अनगाव,गोवे,वडुनवघर, पिंपळघर राजनोली,
खोणी,खालिंग बुद्रुक,
सर्वसाधारण – खारबाव,निवळी,
पूर्णा,केवणी,सवाद,
काटई,पिंपळनेर,
सोनाळे,धामणगाव,वांद्रे,पायगाव,माणकोली,मालोडी,खांडवळ,डुंगे,सुरई सारंग,दिवे अंजूर,
गुंदवली,वेहेळे,लोनाड,
वडवली,भरोडी,
बोरिवली तर्फे राहुर,
चौकट
अनुसूचित क्षेत्रातील
ग्रामपंचायती आरक्षण..
अनुसूचित जमाती महिला – ब्राह्मणगाव,
गणेशपुरी,वज्रेश्वरी,्महाळुंगे,अस्नोली,मालबिडी सूर्यानगर,सुपेगाव,
पालखणे,एकसाल,दुधनी,
झिडके,पहारे,चाणे,
कुंदे,दिघाशी,
पाच्छापूर,मोहंडुळ,
चिंबीपाडा,कुहे,
पारीवली
अनुसूचित जमाती सर्वसाधारण – अकलोली,घोटगाव, दुगाड,मोहिली,
नांदीठणे, पिळंझे, मैंदे,वेढे,वारेट,
खरिवली शेडगाव,
चिंचवली तर्फे कुंदे,अंबाडी,दाभाड,
केल्हे,शिरोळे,पाये,
खडकी,गाणे फिरिंगपाडा,
लाखिवली,कांबे अशा विविध ग्रामपंचायत
चे आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे सदस्य व सरपंच उपस्थित असल्याने पोलिसांनी सभागृह व बाहेरील रस्त्यावर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला होता .

