भिवंडी ( शरद भसाळे ) जैन समाजाचे आराध्य दैवत श्री.भगवान महावीर स्वामी यांचा जन्मोकल्याण महोत्सव भिवंडी शहर परिसरातील मंदिरात मोठ्या धुमधडाक्यात भक्तीमय वातावरण संपन्न झाला.यानिमित्ताने बुधवारी सकाळी ८ वा. वाजत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील आराधना भवन मंदिर येथून वाजत गाजत भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य रथयात्रा काढण्यात आली होती. निघालेल्या या रथयात्रेत पारंपरिक पद्धतीने वेषभूषा करून सुमारे दहा हजारांहून अधिक महिला व पुरुष सहभागी झाले होते.
भगवान महावीर उत्सवा निमित्त शहरातील नेमिनाथ मंदिर, सुपार्श्वनाथ मंदिर, शंखेश्वर मंदिर व श्रद्धा मंदिरात नवकार महामंत्र जप करून भगवान महावीर यांची आराधना करण्यात आली.जैन महासंघाच्यावतीने भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जैन मंदिरात सकाळी भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून वाजत गाजत रथयात्रा काढण्यात आली होती.जैन समाजाचे गुरूवर्य आचार्य हेमप्रभ सुरेशश्वरजी
महाराज,आचार्य जनधर्म सुरी,पन्यास गौतमरत्न विजय,पन्यास नयनरत्न,जैन महासंघाचे मिठालाल जैन,
महापौर नारायण चौधरी,आमदार महेश चौगुले, खासदार सुरेश (बाळामामा ) म्हात्रे,भाजप अध्यक्ष रवींद्र सावंत,त्रिलोकचंद जैन,जयंतीलाल भंडारी,सुरेश पालरेचा जैन,
प्रदिप राका,छगनराज (पप्पू) रेएडगोता,नगरसेवक निलेश चौधरी, हनुमान चौधरी,पारस वेदमुथा, अशोक जैन, नरेंद्र जैन,यांच्या सह मोठ्या संख्येने जैन बांधव सहभागी झाले होते निघालेली रथयात्रा ठाणगे आळी,नवीचाळ, प्रभुआळी मंडई,कणेरी,गौरीपाडा,
धामणकर नाका चौक ते अंजुरफाटा रोडवरील शंंखेश्वर मंदिर येथे दुपारी समारोप झाली यावेळी महाप्रसाद सुध्दा आयोजित करण्यात आला होता.हजारो महिला व नागरिकांनी
महाप्रसादाचा लाभ घेतला.

