भिवंडी (भानुदास भसाळे ) देशातील विविध राज्य व शहरात टोरंट वीज पुरवठा करणारी कंपनी व औषध व्यवसाय तसेच अन्य उद्योग क्षेत्रात अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टोरंट ग्रुपचे संस्थापक स्व. यू.एन. मेहता यांचा जन्मशताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात अभिवादन नमन करून व त्यांच्या आठवणींना उजाळा देत साजरा करण्यात आल्याची माहिती भिवंडी टोरंट पावर कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांनी दिली.

टोरंट ग्रुपचेवतीने अहमदाबाद येथे त्यांचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी यू.एन.मेहता यांच्या जीवनावर आधारित ‘द प्रिस्क्रिप्शन’हा चित्रपट दाखविण्यात आला.टोरंट समूहाचे संस्थापक उत्तमभाई नाथालाल मेहता (यू. एन.मेहता) यांना जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागले.मात्र संयम व व्यावसायिक कौशल्य तत्त्वनिष्ठ जीवनात त्यांनी प्रगती केली अशी माहिती या कार्यक्रम प्रसंगी टोरंट ग्रुपचे अध्यक्ष समीर मेहता यांनी दिली.त्यांच्या सन्मानार्थ सामाजिक कार्यासाठी मेहता कुटूंबीय 1 एप्रिल 2024 पासून पुढील 5 वर्षांत यूएनएम फाऊंडेशनला 5 हजार कोटी रुपयांची देणगी देतील हे योगदान टोरंट समूहातील कंपन्यांच्या वैधानिक सीएसआर योगदाना व्यतिरिक्त असेल अशी माहिती सुध्दा त्यांनी यावेळी दिली.

यूएनएम फाऊंडेशन आरोग्य सेवा, शिक्षण,ज्ञान संवर्धन,पर्यावरण, समाज कल्याण,कला, संस्कृती आणि इतर उपक्रमांवर आपले लक्ष प्रयत्न केंद्रित करून मदत कार्य करेल ज्याचा मूळ उद्देश हा आधार वंचितांना लाभ देणे आहे असल्याची माहिती समीर मेहता यांनी दिली.सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.