भिवंडी ( भानुदास भसाळे )भिवंडी शहर व पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे,सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पोलीस उपायुक्त पराग मनेरे यांच्या सह पोलीस अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्याचे आदेश देत सतर्क राहण्याची सुचना दिल्या आहेत त्यामुळे भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या विशेष पथकाने सराईत गुन्हेगार मोहम्मद सर्जील सिराज अहमद मोमीन उर्फ हमजा यास अटक केली असून त्याच्या जवळून सहा मोटारसायकलघ व एक मोबाईल असा एकूण 6 लाख 70 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

भिवंडी शहरातील नारपोली व कोनगाव पोलिस ठाणे हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार,एस.माळी व पोलिस कर्मचारी अमोल देसाई,सचिन जाधव,भावेश घरत,अमोल इंगळे हे करीत होते.वाहन चोरीच्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज व मिळालेल्या माहिती नुसार पोलिस शिपाई अमोल इंगळे यांना एका संशयित आरोपीचे नाव समजले. गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने मोहम्मद सर्जील सिराज अहमद मोमीन उर्फ हमजा यास शहरातील खान कंपाऊंड शांतीनगर येथून ताब्यात घेऊन त्याकडे कसून चौकशी केली असता त्याने वाहन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.त्यानंतर तपासात त्याने भिवंडी शहरा सोबत ठाणे येथील वागळे इस्टेट,वर्तकनगर,मुंब्रा,नौपाडा, शिळडायघर,कापूर बावडी या भागातून चोरी केलेल्या आठ वाहन चोरीच्या गुन्ह्यासह एक घरफोडी व एक मोबाईल चोरीचा असे दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.
दुचाकी दुरूस्ती गॅरेज मध्ये हेल्पर म्हणून काम करणारा मोहम्मद सर्जील सिराज अहमद मोमीन उर्फ हमजा हा सराईत गुन्हेगार असून मागील पाच वर्षं पासून त्या विरोधात 29 गुन्हे नोंद आहेत.या आरोपीस भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी दिली आहे.