भिवंडीत पोलिसां कडून चोरीस गेलेला एक कोटी 43 लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना हस्तांतरण..

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी  ) पोलीस स्थापना दिनानिमित्ताने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात पोलीस दलाच्यावतीने ” रेझिंग डे “सप्ताह सुरू आहे.या निमित्ताने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन पोलीस प्रशासना कडून केले जात आहे.याचाच एक भाग म्हणून नागरिकांचा चोरीस गेलेला मुद्देमाल गुन्हेगारां कडून जप्त करून तो पुन्हा नागरिकांना सुपूर्द करण्यात येत आहे.यावेळी विविध पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.


     भिवंडी शहरातील भादवड येथील स्व.संपदा नाईक सभागृह येथे पोलीस उपाआयुक्त मोहन दहीकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ – 2 यामधील एकूण सहा पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेला एक कोटी 43 लाख रुपये किमतींचा मुद्देमाल तब्बल 246 नागरिकांना अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपाआयुक्त मोहन दहीकर यांच्या हस्ते नागरिकांना सुपूर्द करण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करीत त्यांच्या डोळ्यात अश्रु तरळ होते,यावेळी 169 मोबाईल या सोबतच  मोटारसायकल,रिक्षा,कार, टेम्पो,सोने व चांदीचे दागिने यांचा समावेश आहे. चोरीस गेलेला मुद्देमाल परत कधी मिळणार नाही या चिंतेत असलेल्या  नागरिकांच्या चेहऱ्यावर आपला ऐवज स्वीकारताना आनंद दिसून दिसून येत होता त्यां़नी यावेळी पोलीस दलाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *