जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भिवंडीत शिवसेनेचा भव्य मेळावा संपन्न.

भिवंडी


महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहा – देवानंद थळे

भिवंडी ( शरद भसाळे ) आगामी ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूका शिवसेना भाजप महायुतीच्या माध्यमातून लढविण्यासाठी शिवसेना पक्ष सक्रिय झाला आहे.गांव पातळीवर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढविण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क करून कामाला लागावे आणि ठाणे जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवा असे आवाहन शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख देवानंद थळे यांनी केले आहे.


      आगामी होणाऱ्या पंचायत समिती व ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम ठाणे जिल्ह्यात वाजू लागले आहेत.येत्या १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत जाहीर होणार.त्यामुळे शिवसेना व भाजपा पक्षाच्यावतीने स्वतंत्रपणे बैठकांचे आयोजन करण्यात येत असुन कार्यकर्ते व पदाधिकारी उत्साहाने कामाला लागले आहेत.या अनुषंगाने कार्यकर्तेना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा नाशिक रोडवरील शाग्रीला हॉटेल मध्ये शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.यावेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील,शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवानंद थळे,आमदार शांताराम मोरे,माजी आमदार रूपेश म्हात्रे,लोकसभा संपर्कप्रमुख मदनबुवा नाईक,उपनेते अरूण पाटील,मोनिकाताई पालवे,गोकुळ नाईक यांच्यासह युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे.
आता पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक कार्यकर्तेना न्याय व बळ देण्यासाठी आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्र करून या निवडणुका लढविण्यासाठी शिवसेना सुसज्ज असून होणाऱ्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातूनच लढविल्या जाव्यात अशी अपेक्षा शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी व्यक्त केली आहे.आगामी काळात ठाणे जिल्हापरिषदेवर
महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्तेंनी सज्ज व्हावे असे आवाहन देवानंद थळे यांनी केले.पक्षाच्या कार्यकर्तेनी आपापल्या गटातील नवतरूण व  महिला मतदारांसोबत संवाद साधून  कामाला सुरुवात करावी,
प्रत्येक गटात पदाधिकाऱ्यांनी मिटींग घ्यावी अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या,यावेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील,आ.शांताराम मोरे यांच्या सह मान्यवरांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केली.मेळाव्यास कोनगांव,पडघा,
कशेळी,अंबाडी,राहनाळ,अंजूर,पिंपळास,
काल्हेर,अनगांव अशा विविध गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *