मुंबई महापालिकेच्या रस्त्यावरून जड मालवाहू वाहनांची रेलचेल तात्काळ बंद करण्याची शिवसेना जिल्हाप्रमुखांची मागणी

भिवंडी


—————
पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी अपघात होण्याची भिंती..??

भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी –  ठाणे महामार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी नागरिक हैराण झाले असून वाहतूक पोलिसांकडून कोणत्याही योग्य प्रकारचे नियोजन होत नसल्याने वाहन कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी आता खाजगी हलकी वाहन व ट्रान्सपोर्टव्दारे येणाऱ्या मालाची वाहतूक करणारे जड मालवाहू वाहनांनी मुंबई महापालिकेच्या खाजगी रस्त्याचा प्रवासासाठी वापर सुरू केला आहे.सुस्थितीत असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भरधावपणे वाहतूक सुरू झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याबाबत मुंबई  महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी लक्ष द्यावे आणि या  मार्गावरून वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना प्रवेशबंदी प्रतिबंध करावा अशी मागणी शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख देवानंद थळे  यांनी केली आहे.या संदर्भात लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


        गेल्या काही महिन्यापासून भिवंडीत वाहतूक कोंडी चा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.18 कि.मी.व 60 कि.मी अंतरावर असलेल्या ठाणे व मुंबई कडे जाण्यासाठी सुमारे तीन ते चार तास लागत आहेत.वाहतूक पोलिसांनी भिवंडी ठाणे या मार्गावर वाहतूकीचे नियोजन करावे आणि दररोज वाहतूक कोंडी मध्ये अडकणारे वाहन चालक व प्रवासी नागरिकांसह विद्यार्थ्यांची सुटका करावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे,ठाणे  जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी केली होती.तसेच वाहतूक पोलीस व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सोबत बैठक घेऊन चर्चा सुध्दा केली मात्र तरीही वाहतूक कोंडी बाबतीत उपाययोजना होत नसल्याने स्थानिक नागरिक व वाहन चालक हैराण झाले आहेत. भिवंडी – ठाणे (जुना) महामार्गाचे शेजारी मुंबई महानगर पालिकेचा खाजगी पाईप लाईन रस्ता आहे. हा रस्ता काही महिन्यापूर्वी अतिशय खराब होता मात्र आता हा रस्ता मुंबई महापालिका आयुक्त प्रशासनाने सिमेंट कॉंक्रिटीकरण करून नवीन तयार करण्यात आला आहे.मात्र काही ठिकाणी हा रस्ता अर्धवट काम केल्यामुळे खराब आहे.तसेच रस्ता अरूंद असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी सुध्दा होत आहे. मुंबई पालिकेचा खाजगी रस्ता असल्यामुळे या रस्त्यावरून जड व खाजगी गाड्यांना बंदी आहे मात्र मनपा सुरक्षारक्षक व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने सध्या या रस्त्यावरून सुरळीतपणे वाहतूक सुरू आहे.या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या जलवाहिन्या आहेत सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून गस्त घालण्यात येते कोणत्याही उपाययोजना नाहीत.या रस्त्याचे दोन्ही ठिकाणी प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक कँबिन आहेत मात्र सुरक्षारक्षकांचे वाहतूक रेलचेल कडे दुर्लक्ष असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांना प्रवेश दिला जात आहे.आतातर हा रस्ता सुस्थितीत झाल्याने ट्रान्सपोर्ट मालाची वाहतूक करणारे मालवाहू मोठे टेम्पो, ट्रक,रिक्षासह अन्य वाहन सुद्धा या मार्गावरून सुरळीत भरधापणे सुरू आहेत.उंच जडवाहन या मार्गाने जाऊ नये यासाठी काही ठिकाणी लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात आले होते मात्र ते आता सध्या काढून टाकल्याचे निदर्शनास आले आहे.भरधाव वाहनामुळे अपघात होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या मुंबई मनपाच्या जलवाहिनींना धोका होऊ शकतो त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्त प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे आणि जड व अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवेश बंदी करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी केली आहे.या रस्त्याचे दोन्ही बाजूला असलेल्या गावातील स्थानिक ग्रामस्थांच्या (लाईट) हलक्या गाड्यांना या मार्गावरून प्रवेश देण्यात यावा अशी अपेक्षा देवानंद थळे व  नागरिकांनी व्यक्त केली आहे.जड मालवाहू वाहनांना या मार्गावर तात्काळ  प्रवेशबंदी करावी यासाठी लवकरच मुंबई मनपा प्रशासक तथा आयुक्त व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे देवानंद थळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *