भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी तालुक्यातील दापोडा परिसरातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत असलेल्या एका भंगार गोदामास मध्यरात्रीच्या सुमारास भिषण आग लागण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.ही आग एवढी भयानक होती की पाहता पाहता रौद्र उग्ररूप धारण करीत या आगीत लगत असलेली एकूण चार भंगार दुकान जळून खाक झाली तसेच या आगीच्या भक्षस्थानी या दुकानांसह जवळ असलेली एक चहाचे दुकान व दोन पान टपरी जळून खाक झाले आहेत.तसेच या आगीची झळ रस्त्यावर उभ्या करून ठेवलेल्या वाहनां पर्यंत पोहचल्याने या आगीत एक कंटेनर,एक छोटा बोलेरो टेम्पो व दोन दुचाकी मोटारसायकल सुध्दा जळून खाक झाल्या आहेत.सदरची आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नसून या आगीत लाखो रुपये किमंतीचे मालमत्ता जळून खाक झाली आहे.पोलिसांनी या आगी संदर्भात नोंद घेतली आहे.
भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट मालाची साठवणूक करणारी गोदाम व भंगारची दुकान आहेत या ठिकाणी आग प्रतिबंध करणारे कोणत्याही उपाययोजना नसल्यामुळे वारंवार आगी लागण्याच्या प्रकार घडत असतात काल मध्यरात्री एक वाजल्याच्या सुमारात वळगाव परिसरात असलेल्या एका भंगार गोदामास आग लागली. गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना या आगीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गोगांट सुरू केला आग विझवण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्यामुळे या आगीने मोठ्या प्रमाणात रुद्ररूप धारण केले. संदर्भात स्थानिक नागरिकांनी पोलीस व अग्निशमन दलाला माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आगीच्या ज्वालांनी लगत असलेली गोदाम व दुकान तसेच पान टपरी व वाहनांपर्यंत आपल्या आगीच्या झाकोळयात घेतल्यामुळे सर्व मालमत्ता जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी 5 तास परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळवित आग 6 वा.शांत केली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे.आग भिषण असल्याने पोलिसांनी सुरक्षितता भूमिकेतून या रस्त्यावरील वाहतूक पहाटे 6 वा.पर्यंत थांबवून ठेवली होती.त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.नारपोली पोलिसांनी आगीची नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे.
