भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या टोळीला शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या विशेष पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्या जवळून पोलिसांनी एक बीएमडब्ल्यू कार,दोन गावठी कट्टा,दोन पिस्टल असा एकूण सुमारे 17 लाख 35 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
शोएब शाहीद
शेख (वय 23)
नौशाद मक्सुद
आलम खान (वय 22)
अफताब अफसर शेख(,वय 21,सर्व रा.दरभंगा बिहार) व शहाबुद्दीन अलीमुद्दीन अन्सारी, (वय 20 वर्षे,रा.शानदार मार्केट भिवंडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना वंजारपट्टी नाका परिसरातील शानदार मार्केट येथील मोकळ्या मैदाना जवळ रस्त्याच्या बाजुला पाच व्यक्ती त्यांचे सोबत हत्यारे व अग्नीशस्त्र घेवून दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीसांना मिळाली त्यामुळे प्रशांत बर्वे यांनी वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना माहिती दिली त्यामुळे त्यांनी पोनि (गुन्हे) अतुल अडूरकर,पो.नि.विनोद पाटील,सहाय्यक
पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे,सहा.पोलीस निरीक्षक योगेश गायकर,पोलिस कर्मचारी रिझवान सैय्यद,निलेश महाले,लक्ष्मण सहारे,
प्रशांत बर्वे,रोशन जाधव,दिपक सानप,
भुषण पाटील या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत रस्त्या लगत उभ्या असलेल्या संशयित बी.एम.डब्लू कार जवळ जात असताना कार चालकाने कार पळविण्याचा
प्रयत्न.केला.पोलिसांनी पाठलाग करून बी.एम.डब्लू कार क्रमांक एम.एच.02 बी.झेड.5671 थांबविली.यावेळी अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी फरार झाला तर कार मधील शोएब शाहीद शेख,नौशाद मक्सुद आलम खान,
अफताब अफसर शेख,शहाबुद्दीनअलीमुद्दीन अन्सारी यांना ताब्यात घेवून त्यांच्या कार ची झडती घेतली असता त्यांच्या जवळ दोन देशी बनावटीचे कट्टे, दोन देशी बनावटीचे पिस्टल,एक लोखंडी कटावणी, लोखंडी रॉड,दोरखंड,तीन कपडयाचे मास्क, मिरची पुड,एका पिशवी मध्ये सफेद रंगाचे 4 जोड हॅन्डग्लोज, चाकु,सेलो टेप,मोबाईल व एक बी.एम.डब्ल्यु कार असा एकूण 17 लाख 35 हजार 200 रूपये किंमतीच्या मुद्देमालासह चार आरोपी यांना दरोडा घालण्याचे तयारीत असतांना त्यांना पकडले,
त्यांचे विरूध्द शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून शनिवारी दुपारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चार ही आरोपींना 4 जून पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.या गुन्ह्यातील एक आरोपी फरार असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे हे करीत आहेत.

