भिवंडी गुन्हे शाखेची धडक कारवाईत
31 कोटी रुपयांचे १६ किलो मेफेड्रोन पावडरसह दोघे गजाआड…

भिवंडी


  बीएमडब्ल्यू आणि स्विफ्ट डिझायर कार देखील जप्त केली

भिवंडी (शरद भसाळे ) ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार बेकायदेशीर व अवैद्य धंदे करणाऱ्या विरोधात भिवंडी पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे असे असताना भिवंडी शहर.परिसरात ड्रग्जची तस्करी आणि विक्री करणाऱ्यां दोन सराईत दोन गुन्हेगारांना भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांचा विशेष पोलीस पथकाने सापळा रचून अटक केली आहे.त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात एमडी पावडर तस्करीचा साठा जप्त केला आहे.सुमारे १६ किलो मेफेड्रोन (एमडी) आणि बीएमडब्ल्यू कार आणि स्विफ्ट डिझायर कारसह सुमारे ३२ कोटी २० लाख १० हजार १४० रुपयांचा माल जप्त केला असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त अमरसिंह जाधव,ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शेखर बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
      भिवंडी गुन्हे शाखेच अमोल इंगळे आणि  प्रशांत राणे यांना शनिवारी दुपारी नाशिक मुंबई महामार्गावर दोन जण मेफेड्रोन पावडर विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळताच त्यांनी ही माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांना देताच त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, पोलीस निरीक्षक मिथुन भोईर,पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील,पोलीस उप निरीक्षक राजेश शिंदे,सपोनि सुधाकर चौधरी, सुनिल सांळुखे,सुदेश घाग,प्रकाश पाटील,किशोर थोरात, साबीर शेख,वामन भोईर, प्रशांत राणे,अमोल इंगळे, भावेश घरत, विजय कुंभार, सर्फराज तडवी, रविंद्र साळुंखे,माया डोंगरे,
दक्षता सुतार,अनुष्का पाटील अदि पोलीस पथकासह
ठाणे – भिवंडी बायपासवरील ओम साई फॅमिली धाब्यासमोरील रंजनोली नाका येथे रस्त्यावर सापळा रचला. त्यानंतर पोलिसांनी तेथे एक बीएमडब्ल्यू कार आणि एक स्विफ्ट कार थांबवली आणि कारची झडती घेतली असता दोन्ही कारमधून सुमारे १६ किलो मेफेड्रोन (एमडी) पावडर जप्त करण्यात आले. पोलिसांनी तनवीर अहमद कमर (२३.रा. मुंब्रा) आणि महेश हिंदूराव देसाई (३५ रा.उल्हासनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर मुंब्रा, डायघर, भायखळा मुंबई आणि कोल्हापूर पोलीस ठाण्यात घरफोडी आणि बेकायदेशीर पदार्थांचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी तनवीर अहमद कमर हा मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एनडीपीएस गुन्ह्यात फरार होता.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(अ), २२(अ), २९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाख जनार्दन सोनावणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *