जिल्हापरिषदेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे -भिवंडी तालुका प्रमुख करसन ठाकरे यांचे आवाहन…

भिवंडी


भिवंडीत शिवसेनेची मोर्चा बांधणी सुरू.


भिवंडी ( शरद भसाळे ) ठाणे जिल्हा व विशेष करून भिवंडी हा शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला आहे.याचे महत्त्वाचे कारण म्हणजे येथील शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे,स्व. आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली काम करून पक्ष वाढवून मजबूत केला आहे.गत जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार घवघवीत यश मिळवून विजयी झाले होते,त्यामुळे आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी एक दिलाने एकजूट होऊन पक्षाचे काम करून जास्तीत जास्त शिवसेना पक्षाचे उमेदवार निवडून आणून ग्रामपंचायत, पंचायत समिती व ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना पक्षाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज रहा असे आवाहन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे भिवंडी तालुका प्रमुख करसन ठाकरे यांनी केले आहे.


    आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख करसन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदार व शिवसैनिकांशी संपर्क साधून मोर्चा बांधणी सुरू केली आहे.याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद गटनिहाय प्रभाग रचना व निवडणूक प्रचार संघटात्मक कामाचा आढावा घेण्यासाठी भिवंडीतील राजनोली येथील शिवसेना ठाणे जिल्हापरिषदे जनसंपर्क कार्यालयात नुकतीच तालुका प्रमुख करसन ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली यावेळी शिवसेना उपनेते विश्वास थळे,सोन्या पाटील, संपर्कप्रमुख साईनाथ तारे, कुंदन पाटील,
जि.प.च्या माजी सभापती दर्शना ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्वांनी जिल्हा परिषद गटाची माहिती देऊन एक दिलाने काम करायचे आवाहन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असून भविष्यात महाविकास आघाडी बरोबर सुद्धा निवडणूक लढवण्याबाबत वरिष्ठस्तरावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.
पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेनी एकत्र येऊन जिल्हा परिषद गट प्रभागाचा आढावा घेऊन कामाला सुरुवात करावी,आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन तालुका प्रमुख ठाकरे यांनी
बैठकीत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *