भिवंडी ( प्रतिनिधी ) उन्हाचा तडाखा वाढू लागला तसा पाणी टंचाई चा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.राज्य शासन व ठाणे जिल्हाधिकारी यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना पाणी टंचाई संदर्भात तातडीने सव्हेँ करून नागरिकांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र भिवंडी तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यांनी या आदेशाने तिलांजली दिल्यामुळे विविध ग्राम पंचायत हद्दीत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे त्यामुळे महिला व नागरिकांचे हाल होत असून पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.

भिवंडी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत क्षेत्रातील नळ पाणी पुरवठा योजना ठप्प पडलेल्या असल्याने तेथील विविध गांव आदिवासी पाडे वस्त्यांवर पाणी नसल्याने या पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला. अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष होत असल्याने या समस्येला वाचा फोडण्यासाठी आज सोमवारी श्रमजीवी संघटनेच्यावतीने पुरुष व महिला वर्गाने भिवंडी तालुक्यातील विविध 10 ग्रामपंचायती कार्यालयावर मोर्चा हंडा मोर्चा काढून अधिकारी व शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.याबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

भिवंडी तालुक्यातील वडपे,दाभाड, जुनांदुर्खी,गणेशपुरी,अकलोली,वज्रेश्वरी,महाळूंगे,घोटगाव,दाभाड,राहुर,धामणगाव या गावातील आदिवासी पाड्यांवर पाणी टंचाईची भिषणता निर्माण झाली आहे.याबाबत अधिकारी वर्गास तक्रार दिली तरीसुद्धा स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसल्याची माहिती श्रमजीवी चे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांनी दिली आहे.भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत.परंतु गावांमध्ये पाण्याचे स्तोत्र नसताना केलेला खर्च कुठे गेला याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे.अनेक ठिकाणी ठेकेदार हे वेगवेगळे असल्या कारणे देत कामे रेंगाळत पडले असल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य ग्रामीण जनतेला बसत असल्याची माहिती अशोक सापटे यांनी दिली.केला आहे.या मोर्चात युवानेते प्रमोद पवार,तालुकाध्यक्ष सुनील लोणे,
शहराध्यक्ष सागर देसक,महेंद्र निरगुडा, मोतीराम नामखुडा यांचेसह स्थानिक गाव कमिटी सदस्य महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ज्या गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या बिकट आहे तेथे तात्काळ टँकर द्वारे पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी या मोर्चाच्या वतीने सर्व ग्रामपंचायत प्रशासना कडे करण्यात आली आहे.