भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीचे रिंगणात असलेले भाजपा उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार सुरू केला आहे.

असे असतानाच त्यांनी ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण समर्थ बैठक परिवाराचे प्रेरणास्रोत श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची अलिबाग रेवदंडा येथील निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेऊन त्यांची आस्थेने चौकशी केली. या प्रसंगी सचिनदादा धर्माधिकारी,राहुल धर्माधिकारी,भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेवक सुमित पाटील,राम माळी आदी मान्यवर उपस्थित होते.