पोलीस बंदोबस्तासह निवडणूक यंत्रणा पूर्ण सज्ज – संजय जाधव
भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी लोकसभा मतदार संघा मध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचार रॅली बरोबर मतदारां सोबत संवाद गाठीभेटी जोमामध्ये सुरू असून हा प्रचार आता अंतिम टप्प्यात येत आहे.तर दुसऱ्या बाजूला लोकसभा मतदारसंघात कायदा सुव्यवस्था व शांततापूर्ण निर्भय वातावरणात निवडणूक मतदान व्हावे यासाठी शासकीय यंत्रणा सुद्धा सुसज्ज झाली असून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंनगारे व ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय व पोलीस यंत्रणा सतर्कपणे काम करीत आहे. 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येत असून यामध्ये सहाही मतदार संघात एकूण 20 लाख 87हजार ,244 मतदार आहेत यात पुरूष मतदार 11लाख 29हजार ,714 तर महिला मतदार 9 लाख ,57हजा ,191 तर तृतीय पंथीय 339 असे एकूण 20 लाख 87 हजार ,244 मतदार संख्या आहे. मतदार यांच्या सेवेकरीता निवडणूक प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्व नागरिकांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.
भिवंडी पुर्व,भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, शहापूर, कल्याण (प)व मुरबाड अशा 6 विधानसभा मतदार संघात एकूण 2 हजार 191 मतदान केंद्र आहेत.
यामध्ये 134 भिवंडी ग्रामीण मध्ये मूळ 344 मतदान केंद्र व एक वाढीव 1 असे एकूण 345 मतदान केंद्र आहे. 135 शहापूर मध्ये 326 मतदार केंद्र, 136 भिवंडी (पश्चिम)
मध्ये मूळ 293 अधिक वाढीव 4 असे एकूण 297 मतदान केंद्र, 137 भिवंडी पुर्व विधानसभा मतदार संघात केंद्र मूळ मतदान केंद्र 304 अधिक 10 असे एकूण 314 मतदान केंद्र, 138 कल्याण (पश्चिम) मतदार संघात एकूण मूळ मतदान केंद्र 397 अधिक एक असे 398 तर 139 मुरबाड मतदार संघात 511 मतदान केंद्र आहेत.
या सहा विधानसभा मतदार संघात एकूण मूळ मतदान केंद्र 2 हजार 175 अधिकची 14 अशी एकूण 2191 मतदान केंद्र आहेत. निवडणूकीत एकूण 27 उमेदवार उभे असल्यामुळे एकूण 2 बी.यू लक्षात घेता एकूण 878 युनिट लागणार आहेत.या सर्वांकरीता एकूण 2191 ईव्हीएम लागणार आहेत. 20 टक्के अधिक मशीन तयार करून ठेवण्यात आले आहेत
अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांनी दिली. बी.यू 20 टक्के प्रमाणे 439 सी.यू. व्हीव्हीपँट मशीन लागणार आहेत.
या सर्व मतदानात केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी एक, दोन व तीन,शिपाई यांची नेमणूक करण्यात आलेले आहेत.एकूण मतदान केंद्राध्यक्ष 2 हजार 191 राखीव 220, मतदान अधिकारी नंबर 1 करीता एकूण 2 हजार 191 व राखीव मतदान अधिकारी 220, मतदान अधिकारी नंबर 2 व 3, शिपाई कर्मचारी 6 हजार 573 व राखीव कर्मचारी 660 व प्रत्येक केंद्रावर पोलीस कर्मचारी 2191 या प्रमाणे मनुष्यबळ लागणार आहे. त्याच बरोबर भिवंडी ग्रामीण मध्ये 345 मदान केंद्र करीता 46 क्षेत्रीय व 46 सहायक क्षेत्रीय अधिकारी, 135 शहापूर मध्ये 326 मतदान केंद्र असून 48 क्षेत्रीय अधिकारी, 48 सहायक क्षेत्रीय अधिकारी, 136 भिवंडी (पश्चिम)मध्ये 297 मतदान केंद्र असून त्यात 29 क्षेत्रीय तर 29 सहायक क्षेत्रीय अधिकारी, 137 भिवंडी (पूर्व) मध्ये 314 मतदान केंद्र असून त्यात 30 क्षेत्रीय अधिकारी व 30 सहायक क्षेत्रीय अधिकारी, 138 कल्याण (पश्चिम)
मध्ये 398 मतदान केंद्र असून 42 क्षेत्रीय तर 42 सहायक क्षेत्रीय अधिकारी, तर मुरबाड मतदार संघ येथे 511 मतदान केंद्र असून 72 क्षेत्रीय व 72 सहायक क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व नियुक्त कर्मचारी यांना निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे सर्व प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानावर नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या करता वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सहा विधानसभा मतदार संघात एकूण 263 झोनमध्ये यामध्ये 241 बसेस, मिनी बस 149, मोठे ट्रक 22, टेम्पो 12, जीप 472, कार 11 अशा एकूण 936 वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान जनजागृती करण्याकरता स्वीप उपक्रमाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून, माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आलेली आहे. मतदाराची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याकडे देखील लक्ष देण्यात येत आहे. मतदान केंद्रावर पुरेशा पिण्याच्या पाण्याची सोय, व्हील चेअर, पाळणाघर, सावली करिता मंडप, प्रथमोपचार सोयी, आशा वर्कर यांच्या देखील नेमणुका करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत मतदार स्लिप वाटपाचे काम देखील सुरू करण्यात आले आहे, निवडणुकीच्या कामाकरीता संपूर्ण निवडणूक प्रशासन पुर्ण सज्ज झाले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.
