पालिका अधिकारी व पोलिसांची धावपळ उडाली.
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिका हद्दीतील कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचा रद्द केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्या मुळे शहरातील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी जमा झाले आहेत नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. कचऱ्याला दुर्गंधी सुटल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे याबाबत महापालिका आयुक्त प्रशासनाला व आरोग्य स्वच्छता विभागाच्या सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख,आरोग्य निरीक्षकांना तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आक्रमक होता सायंकाळी आमदार महेश चौगुले,माजी सभागृह नेते सुमित पाटील भाजपा शहराध्यक्ष अँड हर्षल पाटील यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन करीत महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर कचरा फेक आंदोलन करीत पालिका प्रशासनाचा गलथान कारभाराचा निषेध केला.

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस व महानगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली होती या आंदोलनात माजी नगरसेवक श्याम अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने महिला,नागरिक व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले होते.भिवंडी शहर परिसरात नियमित ठेकेदारामार्फत कचरा उचलला जात होता मात्र पालिका प्रशासनाने ठेकेदाराचा ठेका रद्द केल्यामुळे कचरा उचलणे बंद झालेले आहे.याबाबत आमदार महेश चौगुले व अन्य लोकप्रतिनिधी यांनी महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे यांची भेट घेऊन दोन दिवसापूर्वी कचरा उचलणे संदर्भात सूचना केली होती मात्र महापालिका प्रशासन व आरोग्य स्वच्छता विभागाच्या अधिकारी, विभाग प्रमुख कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहे त्यामुळे पादचारी नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. शहरातील ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी सुटली असून शहर बकाल झाले आहे त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी महापालिकेच्या इमारत प्रवेशद्वारावर जोरदार निषेध घोषणाबाजी करीत आंदोलन करीतनिदर्शने केली.यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी अचानक आपल्या सोबत आणलेला कचऱ्याचा डंपर मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर टाकला.यामुळे पालिका सुरक्षा रक्षक तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती.मुख्य इमारती समोर रस्त्यावर कचऱ्याचा ढिग साचल्याने सर्वत्र मोठी दुर्गंधी सुटली होती.अचानक झालेल्या या आंदोलनाबाबत महापालिका आयुक्त प्रशासन व पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे सर्व हतबल झाले होते आणि गर्दी पांगवण्यासाठी धावपळ उडाली होती.भिवंडी महापालिकेत मोठ्या प्रमाणात टक्केवारी व भ्रष्टाचार सुरू आहे.त्यामुळे कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे असा खळबळजनक आरोप आमदार महेश चौगुले यांनी यावेळी केला.