मनसे शहरप्रमुख यांच्या हद्दपारी विरोधात भिवंडी प्रांत कार्यालयात निषेध मोर्चा

भिवंडी

भिवंडी (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर प्रमुख मनोज गुळवी यांच्या हद्दपारीचा निषेध व्यक्त करणे करीत व टोरंट वीज कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात आज मंगळवारी दुपारी भिवंडी शहरात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सर्व पक्षीय कृती समितीच्या नेतृत्वाखाली निषेध  मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात शेकडो महिलासह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


   मनोज गुळवी यांनी टोरंट वीज कंपनी व विविध नागरी समस्या संदर्भात  विविध ठिकाणी आंदोलन केली होती.त्यांच्या गुन्हयाचा तपशील पाहून पोलिसांनी  गुळवी यांना भिवंडीतून हद्दपार केले आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि वीज कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डि.के.म्हात्रे, मदन पाटील यांच्या उपस्थितीत सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्तेनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून मनोज गुळवी याच्यावर करण्यात आलेली कारवाई रद्द करण्यात यावी याबाबत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *