भिवंडीतील संकेत भोसले हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील कामतघर वऱ्हाळदेवी नगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय संकेत भोसले या युवकांची निर्घृण गत आठवड्यात हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर व दुर्दैवी असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे आज मंगळवारी सायंकाळी आठवले यांनी भिवंडीत येऊन पीडित भोसले परिवाराला भेट देऊन कुटुंबातील सदस्यांचे सात्वन केले तसेच उपस्थित पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा करून संबंधित गुन्हयातील आरोपींना अटक करण्याचे सुचना पोलिसांना दिल्या,यावेळी त्यांच्या सोबत आरपीआय गटाचे भिवंडी शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड व पदाधिकारी उपस्थित होते.


     मयत संकेत भोसले हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून 4 आरोपी पळून गेले आहेत.पोलीसांनी या पळून गेलेल्या आरोपींचा देखील लवकरात लवकर शोध घेऊन अटक करावी अशा सूचना देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.पीडित भोसले परिवाराला समाज कल्याण विभागाच्यावतीने सुमारे आठ लाख रुपयांचा आर्थिक निधी मंजूर करण्यात आला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपये मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून संपूर्ण आरपीआय पार्टी पीडित कुटुंबा सोबत असल्याची माहिती यावेळी आठवले यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीला स्थानिक पोलिसांचा हलगर्जीपणा झाला असून याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी आठवले यांनी केली.कामतघर वऱ्हाळदेवी नगर परिसरातील नागरिक मोठ्या व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *