खाडी किनारी असलेल्या गावठी दारू भट्ट्या भिवंडी पोलिसांनी केल्या उध्वस्त

भिवंडी


5 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट.

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर व ग्रामीण भागात छुप्या मार्गाने गावठी दारू ची वाहतूक व विक्री करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहे.राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या कडे तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष होत असल्याने आता पोलीस यंत्रणा सतर्कपणे बेकायदेशीर पणे दारू विक्री व तयार करणाऱ्या विरोधात कारवाई करीत असुन भिवंडी तालुक्यातील खारबाव कामण रस्त्यावरील खार्डी गावचे परिसरात रेल्वे रुळाच्या बाजूला खाडी किनारी असलेल्या जंगलात अवैद्यरित्या गावठी दारूची हातभट्टी लाऊन दारू तयार करण्याचे ठिकाणी
भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
दादोसा एडके यांच्या पोलीस पथकाने छापा कारवाई करीत दारूची भट्टी उध्वस्त केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
    पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की भिवंडी वसई महामार्गावरील खार्डी गांव येथील खाडी लगतच्या जंगलात गावठी दारू बनवण्याची भट्टी सुरू असल्याची माहिती भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादोसा एडके  यांना मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नरेश निंबाळकर, पोलीस हवलदार दामोदर पवार, काशिनाथ सोनवणे, जयवंत मोरे यांच्या पोलिस पथकासह खाडी किनारी जंगलात छापा कारवाई करीत 72 ड्रम मधील 14 हजार 400 लिटर वॉश असा पाच लाख 4 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल भिवंडी तालुका पोलिसांनी नष्ट केला असून या हातभट्टी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *