बँकाचे एकूण 35 कार्ड रोख रक्कम हस्तगत
भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील विविध भागात काही महिन्या पासून बँकेच्या एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांची हातचलाखी करून फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत असे असतानाच शहरातील बागे फिरदोस मशिदी जवळील एटीएम मशीन मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या इसमाची फसवणूक करून 14 हजार रुपयांची रक्कम फसवणूक करणाऱ्या दोघा इसमांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे,त्यांच्या कडून वेगवेगळ्या बँकचे 35 एटीएम कार्ड व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अबुलबशर रईस खान (वय 38) मोहम्मद हशीम हयातुल्ला शाह (वय 28 दोन्ही रा. अपना हॉस्पीटलच्या समोर, गैबीनगर, भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नांवे आहेत.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की भिवंडी शहरातील आमपाडा या भागात राहणारे फिर्यादी अबुशहमा अब्दुल्ला अन्सारी हे मुंबई आग्रा रोडवरील भिवंडीतील बागे फिरदोस एच.पी. पेट्रोल पंपाच्या समोर असलेल्या एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्याकरीता गेले असता अनोळखी इसमांनी त्यांची नजर चुकवून एटीएम कार्ड हातचलाखीने बदली करून व पासवर्ड बघून फिर्यादी यांचे खात्यातुन 14 हजार रुपये काढुन त्यांची 18 फेब्रुवारी रोजी फसवणूक केली, त्यामुळे या संदर्भात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलीस उपाआयुक्त मोहन दहीकर, एसीपी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक अतुल अडूलकर, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे,सपोनि.योगेश गायकर,पोलीस उपनिरीक्षक सचिन कुचेकर, पोहवा रिजवान सैयद, लक्ष्मण सहारे, निलेश महाले,दिपक सानप, प्रशांत बर्वे, भुषण पाटील यांचे विशेष पोलीस पथकव्दारे तपास सुरू केला असता मिळालेल्या माहिती वरून त्यांनी अबुलबशर रईस खान व मोहम्मद हशीम हयातुल्ला शाह यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करीत त्यांच्या कडून विविध बँकेचे 35 एटीएम कार्ड व रोख रक्कम पाच हजार 100 रुपये पोलिसांन हस्तगत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली,सदर आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता 24 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.पुढील तपास शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोउप निरी सचिन कुचेकर आहेत.