भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी – ठाणे महामार्गावरील अंजुर पेट्रोल पंम्पा समोर माणकोली नाका परिसरात पिस्तूल (अग्निशस्त्र) विक्री करण्याकरीता आलेल्या इसमास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून अटक केली आहे.त्याच्या कडून गावठी बनावटीचे ०७ माऊजर पिस्टलासह, १० जिवंत काडतुसे जप्त पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुरूचरण जुनेजा (23)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नांव आहे.भिवंडी तालुक्यातील माणकोली परिसरात शस्त्र विक्री करण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळताच त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,
सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण,अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले,गुन्हे शाखा पोलीस उपाआयुक्त शिवराज पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेचे सपोनि धनराज केदार,पोउपनि राजेंद्र चौधरी,पोहवा,मंगेश शिर्के, सुनिल साळुंखे, अमोल देसाई,सचिन जाधव,अमोल इंगळे,भावेश घरत,रविंद्र साळुंके या पोलीस पथकासह माणकोली गांव परिसरात सापळा रचून शस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या गुरुचरण छबिलासिंग जुनेजा (वय २३,रा. मु. पो. पाचोरी, ता. खकनार, जि. बुरहानपुर, राज्य मध्यप्रदेश) यास ताब्यात घेऊन त्यांच्या कडून गावठी बनावटीचे ०७ माऊजर पिस्टल व १० जिवंत काडतुस जप्त केली आहेत.याबाबत नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. त्यास न्यायालयाने 28 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.