भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
भिवंडी ( बी.एस ) भिवंडी शहर परिसरात मोटारसायकल व घरफोडी चोरी चे भयंकर प्रकार होत असुन पोलीस यंत्रणा होणाऱ्या घटनांना पायबंद घालण्यासाठी सतर्क झाली आहे.
भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करणाऱ्या भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या विशेष पोलीस पथकाने मिळालेल्या माहिती नुसार दोन सराईत गुन्हेगारांनामो ठ्या शिताफीने तपास करीत ताब्यात घेऊन अटक करून त्यांच्या कडे सखोल चौकशी करून चार घरफोडी व चार मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करीत सुमारे 6 लाख 94 हजार 80 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार,पोलिस
उपनिरीक्षक निसार तडवी,सहाय्यक पोलीस उप निरीक्षक राजेश शिंदे,पोलिस हवालदार मंगेश शिर्के,
सचिन साळवी,
रंगनाथ पाटील,राजेंद्र राठोड, अमोल देसाई,
सचिन जाधव,अमोल इंगळे भावेश घरत हे भिवंडीतील कोनगाव येथील घरफोडी गुन्हयाचा घटनास्थळापासून रांजनोली गांव,
माणकोली,अंजुर गांव ते डोंबिवली या मार्गावरील 35 ते 40 ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासणी करत असताना संशयित आरोपींची माहिती मिळवली.व त्याद्वारे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण प्राप्त करून त्यांनी शुभम प्रदीप खरटमोल,(वय 22 रा.सरोवरनगर, डोंबिवली), किस्मत अली अमजदअली अन्सारी, (वय 33 रा.जागृती नगर, कुर्ला पूर्व मुंबई) या दोघांना ताब्यात घेऊन अटक करीत त्यांच्या कडे कौशल्याने चौकशी तपास करून कोनगाव सह बदलापूर,अंबरनाथ येथील एकूण चार घरफोडी चे गुन्हे व मुंबई,नवी मुंबई येथील चार मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करीत या आरोपी जवळून सुमारे 6 लाख 94 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,पोलीस उपाआयुक्त शिवराज पाटील,एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पोलिसांनी यशस्वी केली असल्याचे त्यांनी सांगितले.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड करीत आहेत.