भिवंडी वकील संघटनेच्यावतीने  न्यायालय इमारत व परिसर महास्वच्छता मोहीम.. 

भिवंडी

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व मुख्य न्यायालय इमारतीत परिसरात भिवंडी वकील संघटनेच्या माध्यमातून विशेष
महास्वच्छता मोहीम राबविण्याचा उपक्रम राबविण्यात आला, या मोहिमेत मान्यवर वकील व न्यायधिश सहभागी झाले होते.


     नवीन उभारण्यात आलेली न्यायालयाची इमारत अतिशय सुंदर आहे ती अधिक सुंदर व स्वच्छ असावी यासाठी भिवंडी वकील संघटना अध्यक्ष डी.बी.पाटील यांच्या संकल्पनेतून त्यांच्या उपस्थितीत आज (दि.19) रविवार रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या महास्वच्छता विशेष मोहीमेत सेक्रेटरी अँड.सुयोग म्हात्रे,कमिटी चेअरमन अँड,अंकित कडू,अँड.सुधीर भोईर अँड.कल्पेश पाटील,
अँड.मनीष कानिटकर,
अँड.दिपक नाईक अमोल कांबळे,
अँड.अब्दुल बाकी,
अभिषेक भोई, संदीप जडेजा,पूजा ताले, मधुरा लसने शेख यांच्या सह मान्यवर वकील व न्या ए.एच. सय्यद,एच.वाय.
पठाण सहभागी झाले होते.न्यायालयामध्ये न्याय मिळवण्यासाठी येणारे पक्षकार व वकील यांचे आरोग्य निरोगी राहावे तसेच आपले घर आपण जसे स्वच्छ ठेवतो तसे न्यायालय व न्यायालय परिसर सुद्धा सर्वांनी स्वच्छ ठेवावा यासाठी ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याची माहिती वकील संघटनेचे अध्यक्ष दिनेश्वर पाटील यांनी यावेळी दिली न्यायालयाची मुख्य इमारती मध्ये साठलेला केरकचरा,
प्रांगण आणि झाडे झुडपं आणि परिसरात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *