130 फूट उंचीचे इस्कॉन मंदिराची उभारणी.
भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहरात एकात्मतेचा राजा म्हणून गौरविल्या जाणाऱ्या धामणकर नाका मित्र मंडळाच्या 37 व्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मातोश्री वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक वृद्धांना प्रथम गणेश दर्शनाचा सन्मान देऊन पार विधीवत कार्यक्रमास सुरवात करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली.

यंदा उत्तर प्रदेश येथील इस्कॉन चंद्रोदय मंदिराची हुबेहूब पर्यावरणपूरक 130 फूट उंचीची प्रतिकृती बनविण्यात आली आहे.मंदिराच्या गाभाऱ्यात पर्यावरणपूरक कागदी लगदा व शाडूची माती या पासून बनविलेली 14 फूट उंचीची विलोभनीय गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.
गणरायास 25 किलो चांदी पासून बनवण्यात आलेले आभूषण परिधान करण्यात आले आहेत.या सजावट देखाव्याचे उद्घाटन जेष्ठ समाजसेवक आर.सी.पाटील यांच्या तर गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या 25 सीसीटीव्ही कँमेरा प्रक्षेपणाचा शुभारंभ भिवंडी पोलिस उपआयुक्त शशिकांत बोराटे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार महेश चौघुले,
सहाय्यक पोलिस आयुक्त विजय मराठे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी,
भिवंडी इस्कॉन मंदिराचे प्रमुख श्री सुदामा,राजेश शेट्टी,तारु जाधव,
संजय भोईर,मोहन बलेवार,संतोष जम्पाल,राकेश पटवारी,रवी गुज्जा अदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी मंडळाचे उपक्रमाचे कौतुक करून शहरातील गणेशोत्सव उत्साहात पण शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलिस उपआयुक्त शशिकांत बोराटे यांनी केले.प्रसंगी उपस्थितीत पाहुण्यांचे हस्ते महाआरती करून गणेश वंदना करण्यात आली.तसेच मातोश्री वृद्धाश्रमास मंडळा तर्फे औषधांसह भोजन साहित्याचे 37 सेट भेट देण्यात आले. यावेळी पुणे येथील एंजल्स डान्स ग्रुप च्या बाल कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केले.
चौकट
गणेशोत्सव दरम्यान रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना दहा लाख रुपयांचा अपघाती विमा भेट दिला जाणार आहे.तर नेत्र चिकित्सा शिबिरात मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची मंडळा तर्फे मोफत शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे अशी माहिती यावेळी
मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित पाहुणे व जेष्ठ नागरिकांचा मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

