जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भिवंडीत शिवसेनेची मोर्चा बांधणी सुरू..

भिवंडी


————-
भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहा – देवानंद थळे

भिवंडी ( शरद भसाळे )
ठाणे जिल्हा परिषद व ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया राज्य शासन आदेशानुसार महसूल विभागाने सुरू केल्याने काँग्रेस,
भाजप,शिवसेनेने पक्ष,कार्यकर्तेचे बैठका सुरू केल्या आहेत,शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी यांनी सुद्धा निवडणूका लक्षात घेऊन कशेळी गांव येथील शिवसेना पक्ष कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक मेळवा घेऊन भिवंडी शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्तेना पद वाटप करीत मोर्चा बांधणी सुरू केली आहे.


           भिवंडी तालुक्यातील कशेळी गांव शिवसेना पक्ष कार्यालयात नुकताच आयोजित मेळावा कार्यक्रमास शिवसेना उपनेते निलेश सांबरे,
अरूण पाटील, लोकसभा संपर्क प्रमुख मदन नाईक,
भिवंडी पश्चिम शहरप्रमुख शाम पाटील,दिलीप नाईक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद ग्रामपंचायतच्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशा नुसार शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा व त्या अंतर्गत शिवसेना सदस्य मोहीम सुद्धा सुरू केली आहे.यावेळी झालेल्या मार्गदर्शीय भाषणात त्यांनी सांगितले कि आगामी निवडणुका लक्षात घेऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून पक्ष बांधणी सुरू करावी, आपसातील मतभेद विसरून कामाला सुरुवात करावी आणि ग्रामपंचायत व जिल्हापरिषदेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन देवानंद थळे यांनी यावेळी केले. प्रसंगी कोनगांव,
पिंपळास,काल्हेर,
कशेळी,अनगांव अशा विविध गावातील युवकांनी पक्षात प्रवेश केला यावेळी भिवंडी शहर व ग्रामीण भागातील सक्रीय पक्ष कार्यकर्तेना विविध पदावर नियुक्त करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *