भिवंडी ( बी.एस. ) आषाढी एकादशीनि मित्ताने पायी दिंडी सोबत चालणारे वारकरी संप्रदाय नागरिक व भिवंडीतील भाविकांसाठी कपिल पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुमित पाटील यांच्या पुढाकाराने पंढरपूर येथे महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. दोन दिवसापासून सुरू असलेल्या या शिबिरात प्रथमोपचा केेंद्रातून तज्ञ डॉक्टर माफँत रूग्णांची तपासणी करून औषध वाटप करण्यात आली. सुमारे पाच हजारांहून वारकरी संप्रदाय भाविकांना फराळ व पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी छत्री वाटप करण्यात आले.
दरवर्षी भिवंडी सह ठाणे जिल्ह्यातील हजारो भाविक पंढरपूरचा पालखी दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात.पाऊस व हवामानात होत असलेल्या बदलामुळे त्यांना ताप,
अंंगदुखापत,पोटदुखी, मधुमेह,रक्तदाब सारखे विविध आरोग्य समस्या निर्माण होत असतात त्यांना दिलासा देण्यासाठी व सेवा म्हणून हे महाआरोग्य शिबीर गेल्या 6 वर्षांपासून माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
आयोजित केले जात असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सुमित पाटील यांनी दिली.या शिबिरात तज्ञ डॉक्टरासह सामाजिक कार्यकर्ते व भाजप पक्षाचे पदाधिकारी,
माजी नगरसेवक,
कार्यकर्ते सहभागी होत सहकार्य करीत असल्याची माहिती माजी नगरसेवक सुमित पाटील यांनी दिली.