भिवंडीत संकेत भोसले हत्यकांड,वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले कुटुंबियांच्या सांत्वन

भिवंडी

 

भिवंडी ( प्रतिनिधी )14 फेब्रुवारी रोजी भिवंडीतील कामतघर भागातील वराळदेवी येथे राहणारा संकेत भोसले या शालेय विद्यार्थीस बेदम मारहाण झाली होती.या मारहाणीत मुंबई केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.मृत्यूनंतर आंबेडकरी समाजात तीव्र असंतोष पसरला असून संकेत भोसले यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने आंदोलने व मोर्चा काढण्यात येत आहेत.दरम्यान काल रात्री उशिरा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पीडित भोसले परिवार सदस्यांची सांत्वन करण्यासाठी भिवंडीत येत भेट घेत पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.यावेळी परिसरातील नागरिकांसह तालुक्यातील शेकडो नागरिक कामतघर वराळदेवी नगर परिसरात उपस्थित झाले होते.यावेळी वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर व शेकडो कार्यकर्ते हजर होते.भिवंडीत अपहरण करून 14 फेब्रुवारी रोजी अपहरण करून मारहाण झाल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या संकेत भोसलेंच्या हत्येचे पडसाद भिवंडी शहरासह राज्यात अनेक भागात आंबेडकरी जनतेमध्ये उमटले आहेत.बुधवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास मयत संकेत भोसले याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे भिवंडीत दाखल झाले त्यावेळी मध्यरात्रीचा वेळ असताना सुद्धा प्रकाश आंबेडकर येणार असल्याने रात्री दहा वाजता पासून ते भेट देण्यात आलेल्या वऱ्हाळदेवी नगर येथील बौद्ध विहारा बाहेर हजारोंच्या संख्येने आंबेडकरवादी जनता मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *