भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडीशहर परिसरात पोलीस प्रशासन व शासन आदेशाचे नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात ऑर्केस्ट्रा बियर बार मध्ये मोठ्या प्रमाणावर बारबाला अश्लील हावभाव करीत मद्यपी यांचे मन रिजवताना आढळून येत आहेत.ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या आदेशानुसार पोलीस वारंवार कारवाई करीत आहेत असे असताना सुद्धा भिवंडी शहर परिसरातील बार मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असुन भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील अप्सरा ऑर्केस्ट्रा बार मध्ये हिंदी गाण्या वर तंग कपडे घालून अश्लील हावभाव करीत कृत्य करीत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी धडक छापा कारवाई करीत केली.याबाबत काशिनाथ ठोमरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार व्यवस्थापक,कॅशियर,वेटर,आठ महिला गायक व पाच ग्राहक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून या सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवलदार चौधरी करीत आहेत.
