भिवंडी पालिकेचे माजी महापौर  विलास पाटील विधानसभेच्या रिंगणात..

भिवंडी

भिवंडी पालिकेचे माज संवाद साधत मोर्चा बांधणी सुरू.

 

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी विविध पक्षांची मोर्चा बांधणी सुरू झाली असतानाच कोणार्क विकास आघाडीचे अध्यक्ष व भिवंडी महापालिकेचे माजी महापौर विलास पाटील हे भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.त्यामुळे त्यांनी विविध पक्षाचे नगरसेवक,

पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला

आहे.त्यामुळे राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांमध्ये खळबळ मधली आहे.विलास पाटील यांनी भिवंडी महापालिका स्थापन झाल्या पासून विविध राजकीय पक्ष तुल्यबळ असताना सुद्धा कोणार्क विकास आघाडीच्या माध्यमातून पालिकेच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण करीत सत्ता प्रस्थापित केली आहे.

आपण भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघा मधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली आहे.

सन 2002 ते 2022 या कालावधीत त्यांनी स्वतः एक वेळा, त्यांच्या पत्नी सौ प्रतिभा पाटील यांनी दोन वेळा महापौर पदावर विराजमान करून सत्ताधारी पक्षांना धक्का देण्याची किमया केली आहे.अपक्ष म्हणून निवडून येणारे पाटील यांनी बहुमत नसताना सर्व राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी,

कार्यकर्ते यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध

निर्माण करीत त्यांनी महापौर पद  मिळवित भिवंडीत विविध विकास काम करीत लोकांना दिलासा देण्याचे काम केले आहे.

महाविकास आघाडीचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेऊन पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी केल्याची माहिती पाटील यांनी दिली.आपण केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याच्या जोरावर मला नक्कीच उमेदवारी मिळेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

त्यांचे वडील स्व.आर आर पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सभापती पदावर असताना केलेल्या कामाचा व जनसंपर्क चा त्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भिवंडीत शहर जिल्हा स्तरावर महापौर चषक व  चॅलेंज ट्रॉफी च्या माध्यमातून भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धा भरवून त्यांनी युवकांना प्रोत्साहन देण्याचा त्यांनी नेहमी विशेष प्रयत्न केला आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपण नक्कीच यशस्वी होऊन विजयी होऊ अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *