भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी लोकसभा मतदार संघात आज (दि.6 मे)सोमवारी दुुपारी उमेदवारी अर्ज माघारीी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 36 उमेदवारांपैकी 9 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज माघारी घेतल्याने 27 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती भिवंडी लोकसभा
मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणूकीत आता खरी लढत भाजप -शिवसेना महायुतीचे विद्यमान खासदार कपिल पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सुरेश (बाळामामा) म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे तिघां मध्येच जोरदार लढत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून बोलली जात आहे.
23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज कोण मागे घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 36 उमेदवारांपैकी 9 उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या उपस्थितीत आपले अर्ज माघारी घेतले त्यामुळे आता भिवंडी लोकसभा मतदार संघात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत 27 उमेदवार निवडणूकीचे रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली. त्यामुळे ही निवडणूक रंगदार होणार असल्याची चर्चा आहे.या निवडणुकीत प्रामुख्याने
राष्ट्रीय पक्षाचे एकूण 3 उमेदवार
1) कपिल पाटील
(भारतीय जनता पार्टी)
2) मुमताज अन्सारी
(बहुजन समाज पार्टी)
3)सुरेश गोपीनाथ म्हात्रे
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) हे चर्चित उमेदवार आहेत.
तर
राज्यस्तरीय नोंदणी कृत पक्ष
१)अशोक बाहादरे
(सयुंकत भारत पक्ष)
२)कांचन वाखारे
(न्यू राष्ट्रीय समाज पार्टी)
३)दानिश शेख
(बहुजन महा पार्टी)
४)राम सुरेश पांडागले
(अपनी प्रजाहित पार्टी)
५)सैफान चांद पठाण
(भारतीय मानवता पार्टी)
६) मोहम्मद कलींम अन्सारी
( पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक)
७)मोह.अक्रम अब्दुल खान (AIMIM)
एकूण अपक्ष 17 उमेदवार
1) कपिल जयहिंद पाटील
(अपक्ष)
2) चंद्रकांत मोटे
3)मनीषा गोधळे
4)मनोज तुरे
5)मिलिंद काशिनाथ कांबळे
6)रंजना त्रिभुवन
7)वसीम सिद्दीकी
8)विशाल मोरे
9)शंकर मुटकिरी
10)अमिरुल हसन सय्यद
11)जहीद मुख्तार अन्सारी
12)हर्षद म्हात्रे
13)तारा पिंट्या वाघे
14)सोनाली गंगावणे
15)सुरेश सिताराम म्हात्रे
16)राहुल काठवले
17)निलेश सांबरे
असे 17 अपक्ष उमेदवार निवडणूकीचे रिंगणात असल्याची माहिती भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.
