भिवंडी ( प्रतिनिधी ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षात पद मिळवण्यासाठी नाराजी स्वर उमटत असुन पद न मिळाल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षांतर करू लागले आहेत. त्यामुळे राजकीय समिकरण बदलत असुन सर्वच पक्षाला असुरक्षित वाटत आहे. भिवंडीत सुध्दा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडले असुन काही निवडक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी रामराम करीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ माजली आहे. पक्षालागळती लागल्याने अध्यक्ष कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत.

भिवंडी महापालिकेचे माजी उपमहापौर अहमद सिद्दिकी, कार्याध्यक्ष अनिल फडतरे, प्रवीण पाटील,माजी नगरसेवक अरशद अन्सारी या पदाधिकाऱ्यां सह काही कार्यकर्तेनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.त्यामुळे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचे स्वागत करीत अहमद सिद्दिकी यांना प्रदेश चिटणीस व अनिल फडतरे (चिटणीस) तर प्रवीण पाटील (कार्याध्यक्ष भिवंडी) तर माजी नगरसेवक अरशद अन्सारी यांची शहर अध्यक्षपदावर नियुक्ती केली आहे.त्यामुळे भिवंडीत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट निर्माण झाले असुन आगामी निवडणुकीत प्रचाराची कस लागणार आहे.