भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरातील गुन्हेगार आटोक्यात आणण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण व पोलीस उपाआयुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्ग दर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करीत बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन अटकेची जोरदार मोहीम सुरू केली असतानाच भिवंडी शहरातील नाशिक रोडवरील मिल्लत नगर मामा भांजादर्गा परिसरात सायंकाळी गांजा अंमली पदार्थ विक्री साठी आलेल्या इसमाला गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या विशेष पोलीस पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केली आहे त्याच्या कडून सुमारे बारा लाख 90 हजार किमतीचा गांजा व मोबाईल फोन जप्त केला आहे.या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तातेराव बाळीराम गवते
(वय २७ वर्षे, रा.मु.पो पेनुर, ता.लोहा, जि. नांदेड) असे ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या इसमाचे नांव आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांना माहिती मिळाली कि भिवंडी नाशिक महामार्गावरील
मिल्लत नगर मामा भांजादर्गा परिसरात गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी काही इसम येणार आहेत त्यामुळे त्यांनी
ही माहिती वरिष्ठांना देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांनी स.पो.नि श्रीराज माळी,धनराज केदार, पो.उपनि.रविंद्र पाटिल,सुधाकर चौधरी,पोहवा सुनिल साळुंखे,शशिकांत यादव, रंगनाथ पाटील,किशोर थोरात,प्रकाश पाटिल,वामन भोईर, साबिर शेख,सचिन जाधव,माया डोंगरे, श्रेया खाताळ,अमोल इंगळे,भावेश घरत, उमेश ठाकुर,रविंद्र साळुंखे या पोलीस पथकासह नाशिक महामार्गावरील मिल्लत नगर येथे सायंकाळी सापळा रचला असतात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तातेराव गवते यांस ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे 12 लाख 90 हजार 764 रूपये किंमतीचा 25 किलो 964 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व मोबाईल फोन मुद्देमाल मिळुन जप्त केला आहे. या प्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
