भिवंडी (शरदभसाळे) भिवंडी शहर परिसरात भगवान महादेवाचा महाशिवरात्रौ उत्सव मोठया उत्साहात
संपन्न झाला.या निमित्त रामेश्वर मंदिरात महाप्रसाद, भजन,प्रवचन,किर्तन सारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

मंदिरास आकर्षक विध्युत रोषणाई व फुलांचे डेकोरेशन करून सजविण्यात आले होते.त्यामुळे भाविकांनी सकाळी श्री.रामेश्वर पिंडीला अभिषेक व दर्शना साठी मंदिरात पहाटे गर्दी केली होती. हरहर महादेवाचा घोषणा व शंंखनाद करीत काप आळी,गोपाल नगर,कल्याण व ठाणे मार्गावर नगर प्रदक्षिणा पालखी काढण्यात आली होती.अनुचित प्रकार घडु नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

श्री.रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत करण्यात आला होता.पहाटे अभिषेक सोहळा करून महाआरती करण्यात आली.त्यानंतर वाजत गाजत पालखी शहरात काढण्यात आली.आमदार महेश चौघुले,माजी आमदार रूपेश म्हात्रे,माजी सभागृह नेते सुमित पाटील,माजी सभापती प्रशांत लाड, शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने,मंदिर विश्वस्थ अध्यक्ष अशोक फडतरे, भूषण रोकडे,भरत सकपाळ यांच्यासह मान्यवर महिला व नागरीकानी दर्शन घेऊन खिचडी चा महाप्रसाद लाभ घेतला. शहरातील खडबडेश्वर मंदिर,भिमेश्वर मंदिर, शिवमंदिर,काशी विश्वनाथ मंदिर तसेच राहनाळ, पोगांव दिंडीगड मंदिर तसेच प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेच्यावतीने कामतघर पिस पार्क,मार्केड मंदिर येथे शिवपुजन कार्यक्रम करण्यात आला.