भिवंडी ( भानुदास भसाळे) भिवंडी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात निधी आणून तो खर्च केला जात आहे.शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करून करून भिवंडी चा काया पालट करण्याचा विशेष प्रयत्न केला जात असल्याची माहिती केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली भिवंडी शहरातील 320 कोटी रुपये खर्च करून 14 ठिकाणी करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीट करून रस्त्याचे व इतर विकास कामाचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज सोमवार करण्यात आला.यावेळी त्यांच्यासोबत आमदार महेश चौगुले, शहराध्यक्ष हर्षल पाटील,माजी सभागृह नेते सुमित पाटील,ज्येष्ठ माजी नगरसेवक संतोष शेट्टी,यशवंत टावरे,महिलाध्यक्ष सुनिता टावरे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता केंद्र व राज्य शासन ” घर घर जल ” घर घर नल “योजना माध्यमातून भिवंडी शहराला 100 एमएलडी पाणीपुरवठा योजना मंजूर करून ती कार्यरत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाला आहे.भिवंडी लोकसभा कार्यक्षेत्रात विविध क्रीडांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा मैदानाचा विकास केला जाईल त्याच इंडोर व आउटडोर खेळ खेळण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात येतील तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मेट्रो रेल्वे सुरू करण्यासाठी विशेष प्रयोजन सुरू असून लवकरच रेल्वे सुविधा सुरू करण्यावर भर राहील तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री आवास योजना भिवंडी मध्ये राबवून गरीब गरजू लोकांना घर उपलब्ध करण्याचा उपक्रम सुद्धा राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिली.आमदार महेश चौगुले यांच्या आमदार निधीतून सुध्दा मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही मंजूर केलेल्या कामांचे श्रेय घेतो इतरांसारखे स्वार्थी राजकारण आम्ही करत नाही असा टोला पाटील यांनी विरोधकांना बजावला आहे.दरम्यान दुपारी कासार आळी – फायर ब्रिगेड, – संत नामदेव महाराज पथ ते बॉम्बे फरसाण मार्ट या सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्याचे सुद्धा भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.शहरातील वाढती लोकसंख्या व त्यांच्या गरजा विचारात घेऊन आम्ही राज्य व केंद्र सरकार कडे विविध कामां साठी पाठपुरावा करीत आलो आहोत.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य योजना अंतर्गत गरोदर महिला व लहान बालक यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 60 कोटी रुपये खर्च करून 200 खाटांचे रुग्णालय उभारले जाणार असून त्याचा शुभारंभ सुध्दा आज केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली त्यामुळे भिवंडीचा विकासा कामाला चालना मिळाली होती. मध्यंतरी अडीच वर्षे आघाडी सरकारने या कामांना खीळ घातल्याने काम ठप्प झाली होती,त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्याने शहराच्या विकासाला पुन्हा गती प्राप्त झाली आहे.त्यामुळेच पुन्हा 400 कोटी रुपयांच्या कामांना निधी मिळाली आहे.त्यामुळे आगामी काळात भिवंडी चा चेहरामोहरा बदलणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.