भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील काप कणेरी परिसरातील असलेल्या श्री रामेश्वर मंदिर ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्यावतीने महाशिवरात्र निमित्त अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन सोमवार रात्रीच्या वेळी कीर्तनाचा कार्यक्रम सुरू असताना अचानकपणे अज्ञात इसमाने कार्यक्रमाच्या ठिकाणी दगड,वीट तुकडे फेकल्यामुळे एका महिलेस तो दगड लागला त्यामुळे भक्तांमध्ये धावपळ उडाली यासंदर्भात सदर महिलेने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दगडफेक करणाऱ्या अज्ञात इसमा विरोधात तक्रार दाखल केली आहे.दरम्यान आज सकाळ पासून पोलिसांनी घटनास्थळी विशेष पोलीस बंदोबस्त तैणात केला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि शहरातील काप कणेरी या भागात श्री रामेश्वर मंदिर असुन तेथे महाशिवरात्री निमित्ताने मंदिराच्या ट्रस्ट विश्वस्थांचेवतीने भजन,प्रवचन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमात दररोज शेकडो नागरिक महिला वर्ग सहभागी होत आहेत.सोमवारी रात्री मंदिरात किर्तन कार्यक्रम सुरू असताना परिसरातील चुन्नू शेठ बिल्डिंग च्या रस्त्याकडून एक विट व दगडाचा तुकडा किर्तन ऐकण्यासाठी बसलेल्या पल्लवी राम भारती व अन्य एका या महिलेच्या हाताच्या दंडास व पाठीला लागला त्यामुळे त्यांनी ही बाब मंदिराच्या विश्वस्तांना सांगितले,कोणीतरी अज्ञात इसमाने चालू असलेल्या धार्मिक किर्तनाचे कार्यक्रम करीता जमलेल्या जमावास अडथळा निर्माण होवुन कार्यक्रमातील व्यक्तीला दुखापत करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक विट व दगड फेकली आहेत.त्यामुळे मानवी जिवित व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करणाऱ्या अज्ञात इसमा महाविरोधात पल्लवी राम भारती या महिलेने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन पोलिसांनी तातडीने अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चौकट
सदर महिला व भाविक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता अन्य समाजाचे लोकांनी पोलीस ठाण्याचे प्रांगणात गर्दी केली होती. त्यामुळे तेथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी सावधगिरी बाळगत दोन्ही समाजातील लोकांना शांत करून तक्रार दाखल करून जमावाला पिटाळून लावले दरम्यान मंदिर परिसरात पोलिसांनी विशेष पोलीस बंदोबस्त तैणात केला आहे.
