भिवंडी (प्रतिनिधी) : भिवंडी महानगर पालिकेच्या बेशिस्त कारभाराची अनेक उदाहरणे समोर येत असताना शासन निर्देशानुसार महानगरपालिकेने शहरात राबविलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ४० कर्मचारी राहिल्याचे अनुपस्थित राहिल्याचे आयुक्त प्रशासनाला निदर्शनास येताच या कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी नोटीस बजावल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.मात्र आमचे काही होणार नाही या गुरमीत काही कर्मचारी असल्यामुळे आयुक्त आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भिवंडी महानगर पालिकेत नियमित कामांचा निपटारा होत नसल्याने शहरातील नागरिकांची अनेक प्रकरणे अधिकाऱ्यांच्या टेबलावर धूळ खात पडले आहेत. तर ज्या कामांमध्ये अधिकाऱ्यांचे हित दडलेले आहे,अशा लोकांची कामे होत आहेत. वारंवार हेलपाटे घालून देखील अधिकारीवर्ग कामे करीत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.त्यामुळे नुकत्याच एका नागरिकांनी आत्मदहनाचा प्रकार केला होता.गलथान व भ्रष्ट कामा संदर्भात पालिका आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर केवळ नागरिकांना आश्वासन दिले जाते मात्र कारवाई होत नाही अशी माहिती नागरिकांकडून दिली जात आहे.आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांचा पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर वचक नसल्या ” आओ जाओ घर तुम्हारा ” अशी परिस्थिती पालिकेत सध्या आहे अशी माहिती त्रस्त नागरिक देत आहेत.पालिकेमध्ये कर्मचारी गैरहजर राहणे हि नित्याची बाब होऊन बसली आहे नियमित हजेरी बाबतीत सुध्दा अलबेल आहे.त्यामुळे काही कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर नसतात. तर कार्यालयात हजर असलेले कर्मचारी साईट व मीटिंगमध्ये व्यस्त असतात.त्यामुळे तक्रारदारांना वेळेवर अधिकारी कार्यालयात उपलब्ध होत नाही. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शासन आपल्या दारी हा उपक्रम महानगर पालिका क्षेत्रात राबविण्यात आले.तेथे देखील ४० कर्मचारी गैरहजर असल्याचे खुद्द आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांना आढळून आले. शहरात विविध प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रात आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत कर्तव्यावर गैरहजर राहिल्याबद्दल महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी मनपाच्या ४० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून ४८ तासांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत महापालिकेचे कर्मचारी ठिकठिकाणी नियुक्त करण्यात आले होते. त्यावेळी अनेक विभागांत कार्यरत असलेल्या मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या गैरहजर असल्याचे आयुक्तांना आढळून आले आहेत.त्यामुळे त्यांनी कामाचे शिस्तीचा बडगा उगारला आहे.समाधान कारक खुलासा न केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
