भिवंडी न्यायालयात उपहारगृहाच्या नूतन वास्तुचे मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न..

भिवंडी

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातवकील संघटना संचालित सुरू करण्यात आलेल्या उपहारगृहाचे नामफलक व नूतन वास्तूचे उद्घाटन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश प्रणयकुमार एस.गुप्ता व भिवंडी वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.दिनेश्वर पाटील यांचे हस्ते मोठ्या उत्साहात शनिवारी करण्यात आले.यावेळी मान्यवर न्यायधिश व वकील उपस्थित होते.भिवंडी येथे नुकतेच जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करण्यात आले आहे,

या प्रशस्त असलेल्या न्यायालयाच्या इमारत परिसरात वकील व पक्षकारांकरीता चांगले उपहारगृह सुरू करण्याची मागणी वकील संघटनेकडे करण्यात आली होती.त्यानुसार संघटनेचे अध्यक्ष अँड.दिनेश्वर पाटील व पदाधिकारी यांनी पाठपुरावा करून उपहारगृहाची नुतन वास्तु उभारण्यात आली आहे, त्या उपहारगृहाचे नामफलक व वास्तुचे उद्घाटन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश प्रणयकुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले आहे,या वेळी दिवाणी न्यायाधिश वरिष्ठस्तर व्ही. एन.गिरवलकर,न्यायाधिश परवेज शहजाद,
न्यायाधिश एक.के. शर्मा, न्यायाधिश एल.सी.वाडीकर, न्यायाधिश एस.एस.काळे, न्यायाधिश बी.एस.अग्रवाल, न्यायाधिश एच.वाय. पठाण, न्यायाधिश एस.व्ही.साळवी, न्यायाधिश एस.बी.घूटे,न्यायाधिश पी.के.कदम,न्यायाधिश एस.ए. भूसेकर,भिंवडी वकील संघटनेचे उपाध्यक्ष अँड.गणेश काबूकर, सचिव सुयोग म्हात्रे,सहसचिव दिपेश भोईर,खजिनदार सुधिर भोईर,माजी अध्यक्ष अँड. नारायण अय्यर,सदस्य अँड.अंकीत कडू रमाकांत पाटील,अँड.रोहीदास पाटील,सूर्यशेखर चिटीमले,आजरा मोमीन,नगमा अंसारी सिद्दिकी,अँड.किरण चन्ने अँड. दिपक नाईक,अँड.पंकज मंगेला,अँड.अजय पाटील,अँड. विशाल भोईर,अँड.सुनिल टावरे, अँड.सुरेश मते,अँड.समीर पाटील यांच्या सह मान्यवर वकील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *