भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील ठाणगे आळी येथील ठक्कर शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये दुसऱ्या मजल्यावर शिकवणी घेणाऱ्या क्लासेसमध्ये आज सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास भीषण आग लागण्याची खळबळजनक घटना घडली.आगीने रौद्र रूप धारण केल्याने तीव्रता वाढल्याने आगीच्या ज्वाळामध्ये आजूबाजूचे तीन ते चार दुकानांचे गाळे जळून खाक झाले आहेत.प्रसंग सावधान बाळगल्याने विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन या दोन तासात आटोक्यात आणून विझवली आहे.

भिवंडी शहरातील ठाणगे आळी या परिसरात असलेल्या ठक्कर शॉपिंग कॉम्प्लेक्स असुन या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेल्या
विन टॉप शिकवणी क्लासेस असून येथे सातवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस सुरू असताना मंगळवार सायंकाळी 4 वा. एसी मधून अचानक धूर निघू लागल्याने गोगांट झाला व आग लागली आगीची तीव्रता वाढल्याने आगीच्या ज्वाळांमध्ये आजूबाजूला पसरून या आगीत 3 ते 4 दुकानांचे गाळे जळून खाक झाले आहेत. यावेळी क्लासेस मध्ये अडकून पडलेल्या आठ ते दहा विद्यार्थ्यांना नागरिकांनी सुखरूप इमारतीखाली घेऊन आले.दरम्यान स्थानिक नागरिकांनी पोलीस व भिवंडी मनपाच्या अग्निशमन दलात जवानांना पाचारण केले
त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग दोन तासात आटोक्यात आणून विझवली.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.पोलिसांनी नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे.